ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार ववल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने या वर्षी सुद्धा महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार केला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भागवतभाऊ पाटील हे होते. [ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार पटेल, सरस्वती माता, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सन्मान म्हणून महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा रुमाल, टोपी व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. प्रदीप तायडे, प्रा. महेंद्र सोनवणे, प्रा. डॉ. रेखा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रामदास महाजन यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. [ads id="ads2"]
शेवटी श्री. भागवत पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश वैष्णव यांनी तर आभार डॉ. एस. ए. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सतीश वैष्णव, डॉ. जयंत नेहेते, प्रा. प्रदीप तायडे, श्री. भास्कर पाटील, श्री. ऋषिकेश महाजन यांनी प्रयत्न केले.



