तहसिलरांनी मोठी रक्कम घेऊन बिनशेती परवानगीचा दिला अहवाल ? यावल नगरपरिषद निष्क्रिय, निगरगट्ट आणि विकासक आक्रमक ; प्रांताधिकारी यांचे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) यावल तहसील कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर तसेच यावल येथील हतनूर धरण उपअभियंता यांच्या कार्यालयाला लागून हाकेच्या अंतरावर असलेल्या गट नंबर 1766 ला यावल तहसीलदार महेश पवार यांनी मोठी रक्कम घेऊन विकासाला बिनशेती परवानगीचा अहवाल दिला असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.[ads id="ads1"] 

   दिल्यानंतर यावल नगरपालिका निष्क्रिय निगरगट्ट आणि विकासात आक्रमक असून नदीपात्रात संरक्षण भिंत बांधून टाकल्याने यावल शहरातील 95 टक्के लोकप्रतिनिधी समाजसेवकांनी मूग गिळलेले आहेत का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे या सर्व प्रकाराबाबत एक महिन्यापूर्वी प्रांताधिकारी यांच्याकडे दि.10ऑगस्ट 2022 रोजी लेखी तक्रार दिलेली असताना नदीपात्रातील सुरू असलेले अनधिकृत बेकायदा संरक्षण भिंतीचे काम विकासा आपल्या सोयीनुसार बांधून घेत असल्याने प्रांताधिकारी यांच्यासह संपूर्ण शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.[ads id="ads2"] 

          यावल येथील गट नंबर 1766 बिनशेती परवानगी मिळणे बाबत शेत मालकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून धुळे येथील एका विकासकाने यावल तहसीलदार यांच्याकडे बिनशेती परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता आणि आहे यानुसार यावल तहसीलदार यांनी 13 जून 2022 रोजी सविस्तर चौकशी न करता यावल नगरपालिकेकडे अहवाल सादर करून नदीपात्रात म्हणजे शेत गट नंबर 1766 ला लागून संरक्षण भिंत बांधकामास परवानगी दिली आहे.

  सदर जमिनीवर हडकाई नदीपात्राच्या पाण्यापासून धोका असल्याने तेथे दहा ते बारा फूट उंच संरक्षणासाठी अर्जदाराच्या जबाबानुसार अपेक्षित संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी हमी अर्जदाराने घेतलेली असून त्याशिवाय अंतिम मंजुरी घेणार नाही असा जबाबात नमूद केले आहे.तरी सदरची भिंत बांधण्यास हरकत नाही असे यावल तहसीलदार यांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे.

        अर्जदाराने जबाब दिला आणि यावल तहसीलदारांनी तो ग्राह्य धरला यातच मोठे गुड रहस्य दडपून आहे.

          शेत गट नंबर 1766 हा हडकाई नदी पात्राला लागून असल्याने 'पूर' रेषेची खात्री करताना हडकाई नदी उगम स्थानापासून विसर्ग काढावा लागतो त्यानंतर आडवा क्रासेशन टेबल काढून डिझाईन काढून मार्किंग करायला पाहिजे.गट नंबर 1766 हा पाटबंधारे विभागाच्या लाल,निळी,आणि पिवळी या 'पुर'रेशी पैकी नेमक्या कोणत्या रेषेत येतो याबाबत यावल नगरपालिकेने हतनूर विभागाच्या म्हणजे पाटबंधारे विभागाच्या यावल येथील सब डिव्हिजन उपअभियंता यांच्या मार्फत जळगाव पाटबंधारे विभाग यांच्याकडे परवानगी बाबत आणि पुढील कार्यवाही बाबत पत्र द्यायला पाहिजे होते परंतु यावल नगरपरिषदेने तसे न करता कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग जळगाव या नावाने विकासाच्या हातात लेखी पत्र देऊन जबाबदारीचे घोंगळे झटकले.

        पाटबंधारे विभागाने कोणतीही प्रत्यक्ष खात्री न करता 'पूर'रेषेबाबत परवानगी दिली आहे किंवा नाही असे असताना मात्र विकासकाने संरक्षण भिंत त्यांच्या सोयीनुसार आणि मर्जीनुसार बांधून टाकल्याने भविष्यात अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण राहणार? फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्याकडे तसेच यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार दिलेली असताना संबंधितांनी काम बंद करण्याबाबत फक्त कागदी घोड़े नाचविले असून प्रत्यक्षात काम बंद न करता मोठे आर्थिक षडयंत्र रचल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे,या पुढील कारवाई सर्व संबंधित अधिकाऱ्यां विरुद्ध लवकरच वरिष्ठ स्तरावर लेखी स्वरुपात तक्रार दाखल करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!