ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदिरतील चिमुकल्याणी श्री गणरायाला लेझीमच्या तालावर नृत्य करत वाजत गाजत निरोप दिला.[ads id="ads1"]
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील,चेअरमन श्रीराम पाटील,उपाध्यक्ष रामदास महाजन,सचिव संजय पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे सभासद उपस्थित होते.चिमुकल्याणी लेझिम पथकाद्वारे कलागुण मिरवणुकीतून सादर केले.[ads id="ads2"]
शाळेचे व्यवस्थापक आर.टी.महाजन व् मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी आयोजन केले होते.विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून ग्रामस्थानी त्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली.व विद्यार्थ्यांना पाणी,गोळ्या व बिस्किट वाटप केले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी गणरायाला निरोप देत आनंद घेतला.


