रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील शेतकर्‍याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर तालुक्यातील कुसुंबा (Kusumba Taluka Raver) येथील 66 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध (सोलूशन)  प्राशन करीत आत्महत्या केली. रविवार, दिनांक 4 सप्टेंबररोजी ही घटना उघडकीस आली. [ads id="ads1"] 

  आत्महत्येचे ठोस कारण समोर आले नसलेतरी शेतकऱ्यावर झालेल्या पाच लाखांच्या कर्ज विवंचनेत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत रावेर पोलिसात (Raver Police Station) नोंद करण्यात आली आहे. सुधीर राजाराम जावळे (66) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.[ads id="ads2"] 

कुसुंबा खुर्द (Kusumba Khurd Taluka Raver) येथील सुधीर राजाराम जावळे (वय 66, रा. कुसुंबा खुर्द ता. रावेर) हे शनिवारपासून घरच्यांना काहीही न सांगता निघून गेले होते. मुलांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांच्याच शेतातील लिंबाच्या झाडाखाली मृतदेह आढळला. शेतकऱ्याने सोल्यूशन प्राशन करीत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. शेतकऱ्याकडे साडे सहा एकर शेती असून त्यात केळी लागवड करण्यात आली असून पाच लाखाचे कर्ज असल्याचे त्यांचा मुलगा राहुल जावळे यांनी सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!