रावेर तालुक्यातील गाते येथील मूळ निवासी आणि वरणगाव येथे वास्तव्यास असलेल्या भारत तायडे हे सैन्यात सव्वीस वर्षे सेवा बजावून सुभेदार या पदावरून निवृत्ती स्वगृही परतल्यानंतर त्यांचे सावदा, गाते आणि वरणगाव येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.या वेळी त्यांची सपत्नीक उघड्या जीप मधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. महार रेजिमेंट कडून त्यांना मानवंदना देण्यात आली.[ads id="ads1"]
भारतीय सैन्यात सेवा बजावणाऱ्या सैनिकांबद्दल समाजाच्या मनात आदराची भावना दृढ होत आहे, अशा संमिश्र भावना त्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात उपस्थितांनी व्यक्त केल्या.[ads id="ads2"]
भारत तायडे हे मूळ गाते येथील रहिवासी असून ते वरणगाव येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत.कार्यक्रमास गाते,सावदा व वरणगाव येथील सैन्य प्रेमी, आप्तेष्ट नातेवाईक उपस्थित होते.सैन्यातील विविध शहरातील सेवा निवृत्त महार रेजिमेंटच्या सैनिकांची हजेरी लक्षवेधी होती.
पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही गावकऱ्यांकडून रावेर मध्ये स्वागत