विवरे खुर्द येथील ग्रामसभा विविध विषयावर गाजली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 विवरे प्रतिनिधी (संजय मानकरे) रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या समोर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत प्रोसिडिंग वाचुन कायम करणे ग्रामविकास अधिकारी अतुल पाटील यांनी केले. यावेळी सभेत मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन करण्यात आले.[ads id="ads1"] 

  विवरे खुर्द येथील धान्य दुकान दु. नं ७९ असुन ग्रामस्थांनी सभे मध्ये सदर दुकानाची तक्रार देखील केली आहे धान्य दुकानात वेळेवर धान्य वाटप होत नाही . एका लाभार्थी पासुन ५. रु अधिक घेत असुन रितसर पावती सुधा लाभार्थीना मिळत नाही . धान्य निकृष्ट दजीचे वाटप होते अशी गावामध्ये चर्चा आहे सर्व भोंगळ कारभार या धान्य दुकानात सुरु असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामसभेत दिली आहे. [ads id="ads2"] 

  तसेच गावातील इतर विषाया वर देखील नागरिकांनी समस्या मांडल्या याप्रसंगी सरपंच स्वराताई पाटील. ग्रामसेवक अतुल पाटील. दिपक गाढे. सुभाष पाटील . नसीमा बी शेख शरिफ . सुनिल पाटील. संदीप पाटील. धनश्याम बरवाल, शरिफ मेंबर. अनिल मानकरे. जिवन बोरनारे . कृष्णाजी पाटील . क्लार्क प्रल्हाद लोखडे शिपाई दिनेश पाटील व ग्राम पंचायत सर्व कर्मचारी ग्रामस्थां मोठ्या संख्याने उपस्थित होते.