माधवराव गोळवळकर स्वयंसेवी रक्तपेढीला डॉ.कुंदन फेगडे यांनी दिली सदिच्छा भेट

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



यावल (सुरेश पाटील) 
जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवळकर स्वयंसेवी रक्तपेढीला डॉ.कुंदन फेगडे माधवराव गोळवळकर स्वयंसेवी रक्तपेढीला डॉ.कुंदन फेगडे यांनी दिली सदिच्छा भेट देऊन रक्तपेढी कडून दिल्या जाणाऱ्या सेवेची माहिती जाणुन घेतली.[ads id="ads1"] 

       यावेळी प्रकल्प प्रमुख शरद कोत्तवार व सह प्रकल्प प्रमुख सचिन चोरडिया यांच्या कडून सदर रक्तपेढी बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.हा प्रकल्प एक सेवा आहे.कमालीचे नियम पाळून येथे रक्त संकलन केले जाते मानवी संसाधनांचा गैरवापर टाळण्यासाठी आवश्यक तेवढेच रक्त संकलन केले जाते जेणे करून ज्या वेळी रक्ताची गरज भासते त्या वेळी ते उपलब्ध होणं शक्य होतं.नाही तर आजकाल आपण काही रक्त संकलन केंद्र असे सुद्धा बघतो की अनावश्यक रक्त संकलन करून नंतर रक्ताची मुदत संपल्यावर ते टाकून द्यावं लागत.[ads id="ads2"] 

    नक्कीच या प्रकल्पातुन अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.या प्रकल्पात सर्व प्रकारचे रक्त घटक उपलब्ध असतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जळगाव शहरात पेशंटच्या बेड पर्यंत थेट रक्त पोहचविण्याची सोय केलेली आहे जेणे करून नातेवाईकांना फॉर्म आणि सॅम्पल घेऊन फिरायची गरज पडत नाहीं.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!