वीज कोसळून तरुण ठार, इतर दोन जण जखमी ; जळगाव जिल्ह्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे (Uchande Taluka Muktainagar) शेती शिवारात वीज पडल्याने एक तरुण ठार झाला, तर दोन तरुण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली.[ads id="ads1"] 

तिघे तरुण शेतातील विहिरीत पाईप सोडायला गेले होते, अचानकपणे जोरदार पाऊस आला पावसात भिजू नये म्हणून लिंबाच्या झाडाखाली गेले आणि वीज स्वरूपात अस्मानी संकट कोसळले. उचंदे (Uchande Taluka Muktainagar) शिवारात माणिक जगन्नाथ पाटील यांच्या शेतात विहिरीत पाईप सोडण्याचे काम सुरू असताना विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने[ads id="ads2"]  मुकेश अशोक पाटील (वय - ३३, रा.उचंदे तालुका मुक्ताईनगर जि.जळगाव), गणेश माणिक पाटील (वय - ३४, रा.उचंदे तालुका मुक्ताईनगर जि.जळगाव) आणि शत्रुघ्न काशीनाथ धनगर (वय - ३५, रा.उचंदे तालुका मुक्ताईनगर जि.जळगाव) हे तिघे जवळच्या लिंबाच्या झाडाखाली उभे राहिले असता, काही क्षणांतच लिंबाच्या झाडावर वीज गणेश पाटील कोसळली. यात जखमी शत्रुघ्न धनगर यांच्या अंगावर वीज पडल्याने ते ठार झाले. मुकेश पाटील आणि गणेश पाटील हे जखमी झाले त्यांचेवर उपचार सुरू आहे.

तरुणाच्या मृत्यूने हळहळ

मयत शत्रुघ्न याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, भावेश (12), मुलगी वेदिका (6) असा परीवार आहे. शांत, मनमिळाऊ, साधा सरळ स्वभाव असलेला शत्रुघ्न मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गावासह परीसरातुन या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाकडुन शत्रुघ्नच्या कुटुंबाला मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!