धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - धरणगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील कृष्ण गीता नगर गट नंबर ५४६ मधील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि कॉलनी वासी व ज्येष्ठ नागरिक शाळेतील मुलं यांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. काही दिवसांपूर्वी तर एक ज्येष्ठ नागरिक गाडीवरून पडून त्याला मोठी जखम झाली. शालेय विद्यार्थी देखील अनेकदा सायकलीवर शाळेत जात असतांना पडलेले आहेत.[ads id="ads1"]
कॉलनी वासीयांतर्फे मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, नगराध्यक्ष निलेश आबा चौधरी, नगरपरिषदेचे प्रशासक जनार्दन पवार साहेब यांना अनेकदा निवेदन देऊन देखील आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. [ads id="ads2"]
कॉलनीवासी दरवर्षी न चुकता नगरपालिकेची नियमित घरपट्टी भरून देखील ही अवस्था आहे. कॉलनीत कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. या पदाधिकाऱ्यांसंदर्भात कॉलनीवासी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. कुणीतरी आमच्या रस्त्यांची ही अवस्था पाहून दखल घेईल, रस्त्यांवर मुरूम टाकतील अशी अपेक्षा कृष्णा गीता नगरवासी करीत आहेत.