रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते.[ads id="ads1"]
या स्पर्धेत कबचौउमविच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या महाविद्यालयाील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील कु.अंकिता प्रेमचंद पाटील. व कु.आरती नारायण तायडे. SYBA (इतिहास) या विद्यार्थीनीं भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रियांची कामगिरी या विषयाचे पोस्टर सादरीकरण केले.यासाठी त्यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.[ads id="ads2"]
विद्यार्थीनीना रोख रक्कम व प्रमाणपत्र बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गौरी राणे यांच्या हस्ते देण्यात आले.सदर विद्यार्थिनींना प्रा.प्रदिप तायडे व प्रा.अक्षय महाजन यांनी मार्गदर्शन केले.पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने व संस्थाचालक, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.