Raver : शहरातील पोलीस ठाण्यात दुर्गा उत्सव व ईद मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर प्रतिनिधी ( राजेंद्र अटकाळे
)

रावेर पोलीस ठाण्यात झालेल्या या बैठकीत फैजपुर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले कि , नुकत्याच झालेल्या गणेश उत्सवात रावेरकरांचा चांगला अनुभव या ठिकाणी आहे . संपूर्ण शांतता समिती पदाधिकारी आणि मंडळाचे पदाधिकारी स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते . ठरवून दिलेल्या वेळे पेक्षा एक तास आधीच मिरवणूक संपली होती.[ads id="ads1"] 

  समाजमनात वावरतांना वाईट प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होणार , वारंवार उपद्रव करणाऱ्या आरोपींवर हद्दपार देखील केले जातील . आपले मंडळ आपली जबाबदारी हे कर्तव्य समजावे . दोषींवर कारवाई होणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे . यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष दारा मोहम्मद सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती अध्यक्ष संतोष पाटील , माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन , ज्ञानेश्वर महाजन , शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन , कामगार नेते दिलीप कांबळे , सुधाकर महाजन , अशोक शिंदे , दिलीप पाटील , [ads id="ads2"] अरुण शिंदे , नितीन पाटील , पप्पू गिनोत्रा , आसिफ मोहम्मद , युसूफ खान इब्राहिम खान , शे गयास , उमेश महाजम , गयासोद्दीन काझी , सुधाकर नाईक , अंबिका व्यायाम शाळा अध्यक्ष भास्कर महाजन , ॲड.योगेश गजरे , बाळू शिरतुरे , पंकज वाघ , ॲड.प्रवीण पाचपोहे , महेमुद शेख , हिलाल सोनवणे , प्रदीप सपकाळे , आदीसह समिती सदस्य सर्व पोलीस पाटील मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रास्ताविक पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले तर मनोगत बाळू शिरतुरे , ज्ञानेश्वर महाजन , शे गयास , अशोक शिंदे , प्रल्हाद महाजन , पद्माकर महाजन दिलीप कांबळे यांनी व्यक्त करून विविध सुचना यावेळी मांडल्या .         

         बैठक यशस्वीतेसाठी सहा फौजदार राजेंद्र करोडपती , विजूदादा जवरे , पुरुषोत्तम पाटील , सचिन घुगे , सोनू तडवी यांनी परिश्रम घेतले .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!