जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रधान सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांचे कडून जारी करण्यात आले आहेत.[ads id="ads2"]
अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली होईल अश्या चर्चा सुरू होत्या. अभिजीत राऊत यांनी आपल्या जिल्हाधिकारी असण्याच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यातील कोरोना चांगल्या रीतीने हाताळला यामुळे त्यांचे राज्यभर कौतुक झाले. मात्र अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाली आहे.
हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. त्यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे 2015 बॅचचे जिल्हाधिकारी असून त्यांची आजवरची कारकीर्द उत्तम राहिली आहे. मित्तल यांनी नाशिक, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर मनपा आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. महापूर काळात आणि कोरोना काळात त्यांनी आघाडीवर राहून काम केले होते. जळगाव जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा तरुण, तडफदार अधिकारी लाभले आहेत.


