जळगाव कारागृहातील रक्षकाच्या पत्नीने गळफास घेवून संपविली जीवनयात्रा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव शहरातील (Jalgaon City) निमखेडी शिवारातील (Nimkhedi Shivar) प्रज्ञा कॉलनीतील रहिवासी कल्याणी विशाल सोनवणे (वय - 27) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून जीवनयात्रा संपवली. सदर ही घटना बुधवार दिनांक 29 सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी सकाळी उघडकीस आली. विवाहितेने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात (Jalgaon Taluka Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.[ads id="ads1"] 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट कारागृहातील रक्षक विशाल सोनवणे हे मंगळवारी रात्रपाळीला ड्युटीवर होते. त्यामुळे घरी त्यांची पत्नी, कल्याणी, सासू, सासरे व मुलगी होते. बुधवारी सकाळी विशाल हे घरी परतले असता त्यांना पत्नी कल्याणी या वरच्या मजल्यावरुन खाली का आल्या नाहीत. हे बघण्यासाठी ते वरच्या मजल्यावर गेले असता त्यांना आपल्या पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले. [ads id="ads2"] 

  त्यांनी तात्काळ घटनेची माहिती जळगाव तालुका पोलिसांना (Jalgaon Taluka Police) दिली. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात (Civil Hospital Jalgaon) हलविला. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस (Jalgaon Taluka Police Station) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!