रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
ऐनपूर: ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात करियर मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासोबत जाॅब ओरिएंटेड कोर्स करणे आवश्यक आहे.असे कोर्सेस केलेले असले तर जॉब सहज मिळू शकतो असे त्यांच्या भाषणामध्ये सांगितले. [ads id="ads1"]
तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापिका मानसी पाटील, निंजा कोडर्स हब , यांनी प्लेसमेंट अँड ट्रेनिंग जॉब सेल बेंगलोर यांच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये करिअरच्या संधी विषयी मार्गदर्शन केले. तसेच हेमांगी पाटील,निकिता जावळे,विभेश पाटील सौरभ फालक यांनीही मुलाखत तंत्र, उत्कृष्ट सादरीकरण बाबत मार्गदर्शन केले. आय टी क्षेत्रातील विविध कोर्सेस ची माहिती दिली. [ads id="ads2"]
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले. कार्यक्रमाला १०५ विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके प्रा. डॉ. जे.पी. नेहेते, प्रा. डॉ. आर. व्ही. भोळे प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव प्रा. डॉ. एच. एम. बाविस्कर व विलास एच. पाटील यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका विचारून समाधान करून घेतले. मान्यवरांचे आभार डॉ. जे.पी. नेहेते यांनी मानले.
हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना


