सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. आर. चौधरी सर उपस्थित होते. यशाचे दैदीप्यमान शिखर गाठणाऱ्या गुणवंतांचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती युवा नेते धनंजय चौधरी यांची होती. मोठ्या स्वप्नपूर्तीसाठी अथक परिश्रम घेतल्यास यश नक्कीच मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अजित पाटील (सचिव सातपुडा विकास मंडळ पाल) हे होते. प्रतिकूल परिस्थितीतून यश मिळविणे हे अद्वितीय व अभिनंदनीय आहे. इतर समाजामध्ये प्रगती करणे व आदिवासी समाजात जन्म घेऊन यश मिळविणे यात फरक आहे ,त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवापाड परिश्रम घ्या असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी पाल गावच्या सरपंच श्रीमती.हजराबाई तडवी देखील उपस्थित होत्या.
हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हितेश फिरके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चारुलता चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.आरिफ तडवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रदीप खैरे, प्रा. आशिष जोहुरे, प्रा. दीपेश भुसे, प्रा. कांचन महाजन, प्रा. भाग्यश्री सावंत, प्रा. नफिसा तडवी, प्रा. सपना तडवी, प्रा. शिरीन तडवी, राजू नाथबाबा, विकास बारेला, सय्यद तडवी यांचे सहकार्य लाभले.


.jpg)