जळगाव जिल्ह्यातील लाचखोरीचे कोट्यावधी रुपये पर जिल्ह्यात ? लाच लुचपत विभाग,आयकर विभाग,वाहतूक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 यावल (सुरेश पाटील) जळगाव जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालयामध्ये तालुकास्तरावर आणि इतर कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी हे पर जिल्ह्यातील आणि विभागातील रहिवासी आहेत. संपूर्ण आठवड्याभरात कलेक्शन झालेले कोट्यावधी रुपये हे जिल्ह्यातील काही वरिष्ठ आणि तालुकास्तरीय अधिकारी आपल्या मूळगावी खाजगी चारचाकी वाहनाद्वारे सर्रासपणे खुलेआम नेत असतात याकडे लाच लुचपत विभाग,आयकर विभाग,वाहतूक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप  शासकीय काही अधिकारी, कर्मचारी आणि ज्यांच्याकडून कलेक्शन केले जाते त्यांच्यातच आता उघडपणे बोलले जात आहे.[ads id="ads1"] 

        शासन निर्णयाप्रमाणे आता 98% शासकीय कार्यालये हे आता शनिवार आणि रविवार रोजी बंद सुट्टी राहत असल्याने जिल्ह्यातील अनेक अधिकारी कर्मचारी हे शुक्रवारी दुपारी दोन वाजेनंतरच आपल्या मुख्यालयापासून लांब अंतरावर मूळ गावी जात असतात शुक्रवारी गेल्यानंतर हे अधिकारी सोमवारी आपल्या कार्यालयीन वेळेत हजर न राहता किंवा सोमवारी दुपारी उशिरा कार्यालयात उपस्थिती देत असतात.[ads id="ads2"] 

   एखाद्या वेळेस मंगळवारीच कार्यालयात हजेरी लावत असतात काही कार्यालयातील यांचे संबंधित कर्मचारी किंवा पंटर कार्यक्षेत्रातील नागरिकांना हे सांगतात की साहेब मिटींगला गेले आहेत साहेब साईडवर गेले आहेत साहेब कामा निमित्त बाहेर गेले आहेत असे सांगून नागरिकांना फिरवा फिरवा करत असतात यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपले विविध शासकीय कामे होण्यासाठी भटकंती करीत असून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करीत असतात.

      कोणत्या अधिकाऱ्याचे आजचे दैनंदिन कामकाज कोणते व कोठे आहे? त्याला न्यायालयीन कुठे तारीख आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मिटींग आहे का? इत्यादी माहिती कार्यालयातील आपल्या कर्मचाऱ्यांना व येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक आहे आणि याबाबतची नोंद त्यांच्या अनेक कार्यालयात दर्शनी भागावर लावलेली असते परंतु तशा नोंदी काही अधिकारी आपल्या कार्यालयामध्ये लावत नसल्याने कार्यालयात येणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

     शासकीय कामकाज करताना टक्केवारी किंवा शासकीय काम करताना अधिकारी कलेक्शन कसे करतात हे सर्वांना माहीत असले तरी प्रत्येक आठवड्याला कलेक्शन करण्यात आलेली मोठी रक्कम नेत्यांना आपल्या खास विश्वासातील एखाद्या शिपायाला किंवा कर्मचाऱ्याला हाताशी धरून स्थानिक ठिकाणच्या पेट्रोल पंपावर 50,100,200 च्या चिल्लर नोटा एखाद्या पेट्रोल पंपावर बदलवून (पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा दिसून येईल) त्या ठिकाणच्या 500 आणि 2 हजार रुपयाच्या मोठ्या लाखो रुपयाच्या नोटा दर आठवड्याला आपल्या खाजगी वाहनातून आपल्या मूळ गावाला नेत असतात. अधिकाऱ्यांच्या विश्वासातील कर्मचाऱ्यांबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण यांना इतर दुसरी कामे दिली जात नसतात ही अवैध लाचखोरीची लाखो रुपयाची रक्कम खाजगी चार चाकी वाहनातून नेताना आणि ते चार चाकी वाहन दर आठवड्याला जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात रात्री बे रात्री बे टाईम जा ये करीत असताना काही टोल नाक्यावर यांच्या नोंदी होतातच,सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद होत आहेतच परंतु शासकीय अधिकाऱ्याचा प्रभाव असल्यामुळे यांचे वाहन कुठेही कोणीही अडवून वाहनात काय ठेवले आहे किंवा नाही याची तपासणी करण्याची हिम्मत कोणाची होत नाही आणि या वाहनातूनच लाखो रुपयांची लाच वाहतूक होत असल्याने आता लाच देणाऱ्या मध्ये आणि काही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्येच उघडपणे बोलले जात आहे.

   तरी जिल्हास्तरीय पोलीस अधीक्षक,लाच लुचपत प्रतिबंधक विभाग,आयकर विभाग यांनी तसेच वाहतूक पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवून काही अधिकाऱ्यांची मूळ गावी असलेल्या आणि सुरू असलेल्या विविध कामांची प्रॉपर्टी ची चौकशी करून शासकीय नियमानुसार कारवाई केल्यास अवैध कमाई जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही असे सर्व स्तरात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!