रावेर तालुक्यातील किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या खात्याचे ई - केवायसी करून घ्यावे - तहसीलदार उषाराणी देवगुणे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर प्रतिनिधी  (राजेंद्र अटकाळे)

रावेर तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकन्यांनी जवळच्या सीएससी सेंटर ग्रामपंचयात कार्यालय , आपले सरकार केंद्र याठिकाणी जाऊन आपल्या खात्याचे ई - केवायसी करून घ्यावे , असे आवाहन तहसील उषाराणी देवगुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.[ads id="ads1"] 

   ३६४४१ लाभार्थ्याची मुळ अभिलेखावरून तपासून दुरुस्ती करण्यात आली आहे . सदर दुरुस्ती करण्यासाठी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत दिवस - रात्र दोन सत्रात तहसील कार्यालय रावेर येथे कॅम्प आयोजित करून त्याद्वारे १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे .. दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत नोंदणीकृत लाभाच्यांची माहिती राज्याच्या भुमिअभिलेख नोंदीप्रमाणे अद्ययावत करून अंतीमतः पी . एम . किसान पोर्टलवर अपलोड करणे वई - केवायसीचे काम माहे ऑगस्ट २०२२ अखेर पूर्ण करणेबाबत सूचीत केले आहे .[ads id="ads2"] 

   त्या अनुषंगाने ई - केवासीचे काम करण्यासाठी प्रसिध्दी देणे व आवश्यकता असल्यास त्यासाठी नागरिकांना सदरचे कामकाज पूर्ण करण्यासाठी मदत करणे यासाठी ११७ गावांसाठी ६ ९ ग्रामसेवक व १५ कृषी सहायक असे एकूण ८४ कर्मचाऱ्यांची गावनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे . तसेच नोंदणीकृत लाभार्थ्यांची माहिती भुमिअभिलेख नोंदीप्रमाणे अद्ययावत करून अंतीमतः पी . एम . किसान पोर्टलवर अपलोड करणेकामी ११७ गावांसाठी ३३ तलाठी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . त्यामध्ये प्राप्त प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्याची माहिती राज्याच्या भुमिअभिलेख नोंदीप्रमाणे अद्ययावत करण्यासाठी लाभाच्यांचे ७/१२ उतारे , फेरफार नोंदी , लाभार्थी ही शेतकरी आहे किंवा कसे ? याबाबतच्या बाबीमुळ दप्तरावरुन पडताळणी करण्यात आल्या आहेत . सदर मोहिमेमध्ये मुळ अभिलेखावरुन पडताळणीअंती ४४ ९ ८ लाभार्थी हे अपात्र ठरले आहेत . तसेच ३१ ९ ४३ पात्र लाभार्थी यांना आता पुढील हप्ता खात्यामध्ये जमा होईल . त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे . तेव्हा रावेर तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकरी यांनी जवळच्या सीएससी सेंटर , ग्रामपंचयात कार्यालय , आपले सरकार केंद्र याठिकाणी जाऊन आपल्या खात्याचे ई - केवायसीचे काम पूर्ण करावे , असे आवाहन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!