यावल येथील शासकीय औ.प्र.संस्थेत भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल येथील शासकीय औ.प्र.संस्थेत भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ संपन्न

 
यावल (सुरेश पाटील)

दि.17 रोजी भगवान विश्वकर्मा जयंती चे औचित्य साधून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल येथे अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2022 या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला.संस्थेत आर. ए.सी.वायरमन,कोपा,मेकॅनिक ट्रॅक्टर,ड्रेस मेकिंग असे पाच ट्रेड प्रशिक्षणाकारिता उपलब्ध आहेत. नुकत्याच घोषित झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2022 निकालामध्ये संस्थेचा 92 टक्के इतका निकाल लागला. [ads id="ads1"]        

    शासकीय आयटीआय मध्ये कौशल्य,प्रशिक्षण मिळविण्यासाठी प्रेस्टिज आणि प्राइड जोडण्याचीही गरज आहे, त्या अनुषंगाने या वर्षी पासून दरवर्षी विश्वकर्मण दिनाला दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा संकल्प केलेला आहे.[ads id="ads2"] 

             संस्थेने आयोजित केलेल्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमास यावल येथील सुमंच पेपर प्रा.लि.चे प्रोप्रायटर मनीष चौधरी,सद्गुरु ऑटो सेंटरचे संचालक शशिकांत देशमुख,श्री कॉम्प्युटर्स प्रो.योगेश चोपडे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यां पैकी कोपा ट्रेड मधून दिप्ती चोपडे,मेकॅनिक ट्रॅक्टर ट्रेड मधून (83.17%),ऋषिकेश धोंडकर (80.33%),वायरमन ट्रेड मधून आकाश भोरकडे(80.08%),ड्रेस मेकिंग ट्रेड मधून नीलिमा तडवी,  (79.05%) आणि आरएसी ट्रेड मधून प्रसाद बेंडाळे(75%) या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला.

हेही वाचा :- घरगुती वापराचा गॅस चार चाकी वाहनात ? यावल तहसीलदासह पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?

         या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी प्राशिक्षणार्थ्यांना करियर,रोजगार व स्वयंरोजगार आदी विषयांवर प्रेरणादायी असे बहुमूल्य मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.कार्यकमाचे सूत्रसंचालन विकास पाटील यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्रीमती एस जी देवरे,व्ही पी चौधरी,सौ.एस.एन.फेगडे,ए.वाय.भाबड,व्ही.व्ही.महाजन,पी.व्ही.न्याहळदे,बी.आर.पाटील,पी.एम.तांबट,जे.जी.वाघूळदे,एन.टी.दालवाले, डी.एल.तडवी,आर.व्ही.पाटील यांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!