धरणगाव शहरातील पारोळा नाका परिसरातून मोटार सायकल चोरीस

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर

धरणगाव : शहरातील पारोळा नाका परिसरातील बडगुजर ऑटो गॅरेज जवळून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. धरणगाव शहरातील पद्मालय नगर येथील रहिवाशी अजय प्रकाश गुरव, वय - ४० यांच्या मालकीची बजाज कंपनीची प्लॅटीना मोटार सायकल क्र. ( MH.19 BP - 4850 ) ही दि. १६ सप्टे, २२ शुक्रवार रोजी रात्री ११-३० वाजेच्या सुमारास पारोळा नाकाजवळील गॅरेज जवळ लावलेली होती. 

  अज्ञात चोरट्याने त्यांची मोटार सायकल चोरून नेली आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून धरणगाव शहर व परिसरातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे, व घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसापुर्वी पोलिसांनी एका मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले होते. तरी देखील मोटार सायकल चोरी सुरु असल्यामुळे वाहनधारक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सदर चोरीस गेलेली मोटासायकल ची माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाण्याचे आवाहन मोटरसायकल मालकाने केले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!