जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) पुज्य भदंत अश्वजित हे सुमारे पंचेचाळीस वर्षांपासून बौद्ध धर्माच्या प्रचाराचे काम करीत होते , त्यांच्या अकस्मात निधनाने बौद्ध धर्माची अपरिमित हानी झाली असली तरी त्यांनी केलेली धम्मसेवा ही पुढच्या पिढीसही प्रेरणा देत राहील असे विचार प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले.[ads id="ads1"]
पूज्य भदंत अश्वजित यांचे 12 सप्टेंबर रोजी अकस्मात निधन झाले असता 18 रोजी येथील जेतवन बुध्द विहारात सार्वजनिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला असता वाघ हे मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी भदंत अश्वजित यांच्या विषयी माहिती देतांना सांगितले की ते सुरवातीला नागपूर येथील लोकमत , तरुण भारत , देशोन्नती या दैनिकात काम करीत होते त्या नंतर ते सम्राट या दैनिकात स्तंभ लेखक म्हणून काम करू लागले , त्यांची आतापर्यंत तीन पुस्तके प्रकाशित झालीत , ते बालसंस्कार , महिला संस्कार शिबिरांचे सतत आयोजन करीत , दरवर्षी तीन महिने वर्षावास निमित्त श्रामनेर शिबिर घेत होते , विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम ते महिला वा मुलांकडून करवून घेत होते , त्यांचे कार्य हे अतुलनीय होते.[ads id="ads2"]
कार्यक्रमाच्या सुरवातीला भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस चेयरमन दिलीप सपकाळे , संचालक पी डी सोनवणे , दिलीप तासखेडकर यांच्या हस्ते पुष्प वाहून पूजा करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भालेराव यांनी केले.प्रास्ताविक कविता सपकाळे , परिचय उज्वला तायडे यांनी तर आभार प्रदर्शन नथु अहिरे यांनी केले.चंद्रशेखर अहिरराव , सुनिल बिऱ्हाडे , विजय भालेराव , अशोक सैंदाणे , चेतन बिऱ्हाडे आदिंनी समयोचित भाषणं केली.
कार्यक्रम यशस्वीते करिता पूनम वानखेडे , भारती अहिरे , माधुरी इंगळे , शुभांगी बोदवडे , लता बिऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले द्वारकबाई कोचुरे ,विजेता सोनवणे , विमालबाई भालेराव , सिंधुबाई तायडे , जिजाबाई साळुंके , सुमनबाई बैसाणे , संघमित्रा अहिरराव , सुनंदा वाघ , विजेताबाई शेजवळ,कमलबाई सोनवणे , मीना बिऱ्हाडे , आशा सपकाळे , सविता उबाळे , विजया शिरसाळे , नूतन तासखेडकर , उशाबाई गांगले , सरला भालेराव आदी महिलांसह पुरुष मोठ्या संख्येने हजर होते