सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा.सायबु तडवी सर मुख्याध्यापक)तसेच अध्यक्ष मा.सुमित्र अहीरे सर(बहुजन क्रांती मोर्चा महा.राज्य सहसंयोजक)होते.[ads id="ads1"]
सुत्रसंचालन मा.महेशजी तायडे सर(बिएमपी रावेर विधानसभा प्रभारी) यांनी ,प्रास्ताविक मा.नितिन गाढे सर यांनी तसेच आभार मा.विशाल तायडे(भारत मुक्ती मोर्चा रावेर तालुकाध्यक्ष)यांनी केले.[ads id="ads2"]
सर्वप्रथम ऊपस्थितांचे वर्तमान परिस्थितीविषयी प्रत्येकाचे मत जाणुन घेतले,प्रत्येकाला अभिप्राय म्हणुन कागद आणि पेन वाटप केले,त्यानंतर अध्यक्षता करत असतांना मा.सुमित्र अहिरे सरांनी इतिहासाचे मर्म सांगितले,अगोदर ब्राम्हण भारतात आल्यावर त्यांनी भारतीय संस्कृतीचा कसा सत्यानाश केला,बुद्धांच्या काळात बुद्धांनी लोकांची मानसिकता ४५ वर्षात तयार करुन अराजकता थांबविली,धम्मचक्र गतिमान केले,त्याचा परिणाम मौर्यवंशाचा जन्म झाला,नंतर पुष्यमित्र शृंगाने प्रतिक्रांती करुन भारतातुन बुद्ध विचारधारा अधोगतीस नेली,मग संत महंतांनी केलेली क्रांती,परिणाम शिवरायांचे स्वराज्य,म.फुले यांची सत्यशोधक चळवळ,छ.शाहु महाराजांचे आरक्षण,डाॅ.बाबासाहेबांनी परत धम्मचक्र फिरविले,संघर्ष केला,भारतीय संविधान लिहिले मग परत बहुजनांचे राज्य आले,बाबासाहेबांचे नंतर कांशीराम साहेबांचा संघर्ष आणि वर्तमान भारतात आरएसएसला तोडीस तोड म्हणुन बामसेफच्या द्वारे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेबांचा बहुजनांच्या आझादीसाठी संघर्ष.........या इतिहासावर मा.अहिरे सरांनी प्रकाशझोत टाकला.
त्यानंतर आरएसएसच्या मुख्यालयावर ६ आक्टोबरला देशभरातुन भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा द्वारे मा.वामन मेश्राम साहेबांचे नेतृत्वात जो घेराव म्हणुन विशाल रॅली काढण्यात येत आहे,त्याचे महत्व सांगितले व परिस्थितीचा विचार करुन आपण सर्वांनी या रॅलीत सहभागी होऊन ६ आक्टोबरला नागपुरला यावे याकरिता अपिल केले,त्यानंतर जाता जाता ऊपस्थित सर्व बांधवांनी या कॅडरकँपच्या सफलतेसाठी तसेच विशाल महारॅलीच्या सफलतेसाठी १५००/-रु. जनांदोलन निधी दिला.
या पद्धतीने मा.सुरदास सरांच्या हाॅलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.हाॅलमध्ये सर्व बुद्धिजीवी तसेच सामाजिक इमानदारी जोपासणारे बांधव ऊपस्थित होते.