ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे दलित वस्तीजवळ शेणखताच्या उकिरड्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून मात्र ग्रामपंचायत ने त्याकडे कानाडोळा केलेला आहे.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की ऐनपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर फलका समोर एकाने गुरांच्या शेणाचा उकिरडा टाकलेला असून सध्या पावसाळा सुरू असून या पावसामुळे या उकिरड्याच्या शेणखताचे पाणी रस्त्यावर जमा होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात घाण होत आहे हे शेणखत पाण्यासकट रस्त्यावर बर्याच दिवसांपासून जमा असून यात डासांची उत्पत्ती झालेली आहे.[ads id="ads2"]
या डासांमुळे हिवतापाचे प्रमाण वाढलेले आहे यात डेंग्यू च्या डासांची उत्पत्ती होऊ शकते यामुळे या भागातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे मागच्या महीन्यात ग्रामपंचायत च्या ग्रामसभेला नागरीकांनी या उकिरड्याबाबत आपली कैफियत मांडली होती तरी सुद्धा याकडे ग्रामपंचायत ने लक्ष दिलेले दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे डासांमुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता असुनही ग्राम पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी ग्रामपंचायत कडून फवारणी करण्याची उपाय योजना करण्यात यावी उकिरड्या शेजारी दलित वस्तीतील घरे असल्यामुळे या घाणीची नागरिकांना दुर्गंधी येत आहे त्यामुळे त्याच्या अयोग्यावर परिणाम होत आहे दुर्गंधी युक्त उकिरड्यातल पाणी रस्त्यावर साचत असल्यामुळें या भागातील लोकांना रात्री बेरात्री घाण पाण्यातून ये जा करावी लागत आहे तसेच सदर ठिकाणी डासांची उत्पत्ती करिता पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राम पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देवून योग्य ती उपाय योजना करावी तसेच ज्या व्यक्तीचा उकिरडा आहे त्याला नोटींस देण्यात यावी व उकिरडा उचलण्यात यावा अशी मागणी नागरीकांनकडून होत आहे.