धरणगाव प्रतिनिधी -पी.डी.पाटील सर
धरणगांव - धरणगाव शहरातील व परिसरातील शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणाऱ्या सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने दिनांक २४ सप्टेंबर , २०२२ शनिवार रोजी वेळ सकाळी ९ वा. ते दूपारी १ वाजेपर्यंत माळी समाज व पाटील समाज मढी लहान माळीवाडा, धरणगाव येथे रक्तदान शिबिरात रक्तदान करावे व आपल्या महापुरुषांना आदरांजली अर्पण करावी असे आवाहन सत्यशोधक विचार मंच धरणगाव व सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती धरणगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे व महापुरुषांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शक गावातील सर्व सन्माननीय समाज अध्यक्ष व पंच मंडळ तसेच सर्व समाज बांधव आहेत. [ads id="ads2"]
शहरातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, इ. क्षेत्रातील सर्व संस्था व संघटना यांचे अनमोल सहकार्य आहे. तरी जास्तीत जास्त बांधवांनी रक्तदान करावयाचे आहे.
हेही वाचा :- यांनाच मिळणार PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये; आपले नाव यादीत आहे की नाही ते तपासा