रावेर तालुक्यातील वाघोदे बुद्रुक(Waghode Bk Taluka Raver) येथील स्थानिक रहिवासी तथा महेंद्र ढाब्यावर मॅनेजर असलेल्या ३५ वर्षीय इसमाचा अज्ञात वाहनांच्या धडकेने गुरुवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अपघातात (Accident) मृत्यू झाला. अपघातात मयत झालेल्या इसमाचे नांव नारायण साहेबराव धामोळे आहे.[ads id="ads2"]
महेंद्र ढाब्या वरील काम आटोपून ते रात्री १ वाजता घरी परतत असतांना हा अपघात घडला.त्या नंतर आलेल्या वाघोदा (Waghoda) येथील ट्रक चालकास (Truck Driver) रस्त्यावर अपघात झाल्याचे दिसून आल्याने घटना उघडकीस आली.या प्रकरणी सावदा पोलीसात (Savada Police Station) सुनील इंगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : - रेल्वेतून पडून रावेर तालुक्यातील आभोडा-जिन्सी येथील ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
हेही वाचा :- यांनाच मिळणार PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये; आपले नाव यादीत आहे की नाही ते तपासा
शुक्रवारी सकाळी रावेर ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) डॉ राणे यांनी शवविच्छेदन केले.या घटनेने मोठे वाघोदा (Mothe Waghode Taluka Raver) गावावर शोककळा पसरली आहे.