यावल (सुरेश पाटील)
यावल तालुक्यात चार चाकी वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घरगुती गॅस अवैध खाजगी मशीन द्वारे भरणा करून देणाऱ्यांवर आणि चार चाकी वाहन चालक मालक यांच्यासह गॅस हंडी पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर कारवाई होत नसल्याने महसूलच्या आशीर्वादानेच घरगुती वापराच्या गॅसचा गोरख धंदा सुरू असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तहसील कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एका ठिकाणी एक व्यक्ती आपल्या घरात अवैधरित्या भारत गॅस हंडी आणि एचपी गॅस हंडीचा साठा करून खाजगी मशीनद्वारे चार चाकी वाहनांमध्ये घरगुती वापराचा गॅस अकराशे ते बाराशे रुपयात भरून देत आहे या अवैध व्यवसायास यावल महसूल विभागाचा आशीर्वाद असल्यानेच गोरख धंदा सुरू असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.[ads id="ads2"]
चार चाकी वाहनांमध्ये घरगुती वापराचा गॅस जी कंपनी अवैधरित्या गॅस हंडी पुरवठा करीत आहे ती गॅस एजन्सी तो गॅस कोणत्या ग्राहकाच्या नावाने विक्री करीत असते हा मोठा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहे.आणि गॅस एजन्सीला दर महिन्याला कंपनीकडून किती गॅस हंडी पुरवठा होतो? आणि किती लोकांनी ऑनलाईन बुकिंग स्वतः केली आहे,किती लोकांच्या नावावर गॅस एजन्सी चालकांनी स्वतः बुकिंग केली आहे किंवा कसे?
हेही वाचा :- यांनाच मिळणार PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये; आपले नाव यादीत आहे की नाही ते तपासा
याबाबतची चौकशी यावल महसूल विभागाने कधी केली आहे का? चौकशी केली नसेल तर चौकशी का केली गेली नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल तालुक्यात चार चाकी वाहनांमध्ये घरगुती वापराचा गॅस जो वापरला जातो त्याबाबत फैजपूर भाग विभागीय अधिकारी यांच्या मार्फत चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा अध्यक्ष सुरेश जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.