सातपुडा विकास मंडळ पाल संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथे विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. प्रदीप खैरे यांनी आजच्या तरुणांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले.[ads id="ads1"]
ध्येय निश्चित करून यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत घेण्याचे आव्हान केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. हितेश फिरके होते. यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेत त्यांनी स्वतःच्या कार्यातून दिलेला श्रमप्रतिष्ठेसोबत ज्ञानार्जन करण्याचा दिलेला संदेश आजही सर्वांना उपयुक्त आहे असे सांगितले.[ads id="ads2"]
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी केले सूत्रसंचालन कु. अंजली चव्हाण हिने तर आभार प्रदर्शन कु. रोशन तडवी हिने केले. यावेळी प्रा. शरद वाणी प्रा. आरिफ तडवी प्रा. आशिष जहूरे प्रा. चारुलता चौधरी प्रा. शिरीन प्रा. नफिसा तडवी प्रा. सपना तडवी श्री विकास बारेला श्री सय्यद तडवी श्री राहुल पवार व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा : फैजपूर येथील 32 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा : - SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 जागांसाठी बंपर भरती