निळे निशाण सामाजिक संघटनेची रावेर तालुका महिला मंच ची बैठक संपन्न .....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दि.१८/९/२०२२ रविवार रोजि संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमिकरणसह समाजातील विधवा , घटस्फोटीत , परितक्ता , वयोवृद्ध , अत्याचारित , पिढीत यांच्या संदर्भात सखोल चिंतन करण्यात आले . तसेच यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्या करिता नियोजन करण्यात आले.[ads id="ads1"] 

  त्याप्रसंगी तालुक्यातिल संघटनेच्या महिला प्रमुख पदाधिकार्यासह शाखा अध्यक्षांनी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांच्या समोर महिलांवर होत असेलेल्या अन्याय - अत्याचार संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले तसेच संस्थापक / अध्यक्ष यांनी महिला मंचच्या पदाधिकारी सह शाखा अध्यक्षांच्या व्यथा समजून घेऊन त्यांना समाधानकारक उत्तरे दिले व सांगितले की निळे निशाण सामाजिक संघटना खंबीर पणे सदैव महिलांच्या पाठीशी आहे . [ads id="ads2"] 

त्याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे , जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम , महिला मंच प्रभारी जिल्हा प्रमुख नंदाताई बाविस्कर , रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय बोरसे ( धनगर ) , ता .उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे ( कोळी ) , ता . उपाध्यक्ष शरद बगाडे , ता . संपर्क प्रमुख नारायण सवर्णे , भारतीताई गाढे , अश्विनीताई अटकाळे , पुजाताई छपरीबंद , सुरेखाताई सोनवणे ( कोळी ) , शारदाताई बेलंदार , कल्पनाताई सुरवाडे , साधना ठाकणे इतर शेकडो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!