सावखेडा ते लोहारा रस्त्याची दुरावस्था ; तात्काळ दुरुस्त न झाल्यास निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांचा ईशारा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील लोहारा ते सावखेडा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे गेल्या २५ ते ३० वर्षापासुन तीन तेरा नऊ अठरा वाजले असल्याने संपूर्ण रस्त्याचे मोठमोठ्या खड्यांत रुपांतर होऊन हा रस्ता अपघातास कारणीभुत ठरत आहे. रस्त्यातील हे पाणी शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या रहदारीला खुप मोठा अडथळा निर्माण करीत असुन, वाहने तर सोडाच, माञ पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे, मोजुन सावखेडा ते लोहारा अडीच ते तीन किलो मीटर रस्ता आहे.[ads id="ads1"] 

परंतु लोहारा येथे जाण्यासाठी १२, ते १५ किलोमीटर अंतर कापावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे या लोहारा ते सावखेडा रस्त्याने प्रवास करणे, पायी चालणे, म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे, जीव धोक्यात घालुन शेतकरी, मजुरांना या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे, कारण या रस्त्यात मोठमोठे खड्डे तर आहेतच, परंतु या खड्यांमधे पांझर तलावासारखे डोह निर्माण झाले आहेत.[ads id="ads2"] 

   त्याचबरोबर या रस्त्याने प्रवास नेमका कुठून करायचा? कारण खड्ड्यात रस्ता आहे? का रस्त्यात खड्डे हेच समजायला मार्ग नाही, वेळोवेळी या रस्त्याबाबतीत काही शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकरत्यांनी या (शेतकरी मार्ग) रस्ताबाबतीत निवेदने देऊन देखील, विविध वृत्तपत्रांमधे बातम्या प्रकाशित करुन देखील काहीही उपयोग होत नसल्याने परिसरातील शेतकरी व मजुरांमधे संबधित विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यां बाबतीत नाराजी व्यक्त केली जात आहे. जसा २५ ते ३० वर्षापुर्वी हा रस्ता ज्या परिस्थितीत होता, त्यापेक्षाही अधिक वाईट परिस्थिती या रस्त्याची झाली आहे, जणु हा रस्ता जागोजागी पुर्णपणे फॅक्चर झाला आहे, आता सद्ध्यास्थिती या रस्त्यांची ड्रेसिंग कोण करणार? पदाधिकारी करणार? लोकप्रतिनिधी करणार? की अधिकारी करणार? असे लोहारा, सावखेडा परिसरातील जनतेकडुन, शेतकऱ्यांकडुन मजुरांकडुन बोलले जात आहे व चर्चेला उधान आले आहे. हा रस्ता २० फुटाचा होता आणि १० ते १२ फुटाचा कसा काय झाला याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था पाहुन बरेचशे शेतकरी आपल्या शेतात शेतीमाल पाहण्यासाठी जाणे टाळतात ते नेमके या रस्त्यांच्या खड्यांना पाहुन, व ह्या खड्यांमधे तुडूंब भरलेले तलावांमुळे, अशी या रस्त्याची दयनीय अवस्था कुठपर्यंत राहणार? असाही मोठा प्रश्न शेतकरी, मजूरवर्गाने उपस्थित केला आहे. तरी या रस्त्याच्या संपुर्ण दयनीय अवस्थेकडे संबधित जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याचे ताबडतोब डांबरीकरण करावे. अशी रास्त स्वरुपाची मागणी लोहारा, सावखेडा परिसरातील जनतेकडुन, शेतकऱ्यांकडुन, मजुरांकडुन संबधित विभागाकडे मागणी करण्यात आली आहे, तसेच या लोहारा ते सावखेडा (शेतकरी मार्ग) या रस्त्यांची दखल न घेतल्यास लोहारा सावखेडासह परिसरातील संबधित गावांची ग्रामस्थ मिळुन येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार? असेही परिसरातील जनतेने, शेतकऱ्यांनी, मजुरांनी पञकारांशी बोलतांना सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!