माहेरहुन २० लाख रुपये आणावे या मागणीसाठी विवाहीतेचा छळ करणाऱ्या पती व त्याची प्रेमीके सह आठ जणांवर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर (राजेंद्र अटकाळे)

विवाहितेला घटस्फोट घेण्यासाठी तसेच पतीचे प्रेम संबंध असलेल्या महिलेला २० लाख रूपये देण्यासाठी, माहेरहून पैसे आणावे या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या सात जणांसह, पतीच्या प्रेमिकेविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला (Raver Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.[ads id="ads1"] 

रावेर येथील उटखेडा रोडवरील शिक्षक कॉलनीतील (Shikshak Colony,Utkheda Road,Raver) 27 वर्षीय विवाहितेने याबाबत तक्रार दिली आहे. विवाहितेचा पती गौरव सोपान पाटील (रा. दिघी, पुणे), सासरे सोपान भिका पाटील, सासू प्रतिभा सोपान पाटील (रा शेमळदा, ता. मुक्ताईनगर), नणंद शितल नारायण पाटील, नंदोई नारायण निवृत्ती पाटील (रा. पिंपळे सौदागर, जि. पुणे), लहान नणंद स्नेहल मनेश पाटील, नंदोई मनेश गोपाळराव पाटील (रा.सुंदरमोती नगर, सावखेडा शिवार, जळगाव), चुलत नणंद मनीषा नीलेश पाटील (रा. मोरगाव, ता. रावेर) व खुशी उपाध्यय (रा. विमाननगर, पुणे) यांनी संगनमत करून विवाहितेचा छळ केला. [ads id="ads2"] 

  सासरकडील मंडळीच्या मागणी प्रमाणे तीन लाखांचे दागिने व सहा लाख रुपये रोख दिले होते. तसेच फिर्यादी विवाहितेचा पती गौरव पाटील याचे दुसऱ्या मुलीशी प्रेम असताना, संशयितांनी विवाह घडवून आणला. त्यानंतर संशयितांनी विवाहितेस घटस्फोट दे किंवा प्रेमसंबंध असलेल्या महिलेला २० लाख रूपये देण्यासाठी माहेरहून रक्कम आण, अशी मागणी केली. 

👉 हेही वाचा :-  पोलीस भरतीला स्थगिती..! नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली ; तरुणांच्या पदरी पुन्हा निराशाच

हेही वाचा :- दुचाकी - ट्रकच्या धडकेत मामा-भाची जागीच ठार : जळगाव जिल्ह्यातील घटना 

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

पती सह सासरच्या लोकांनी वारंवार विवाहितेला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास रावेर पोलीस (Raver Police) करीत आहे.

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!