रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर नगरपालिका (Raver Nagarpalika) प्रशासनाने नविन वाढीव हद्दीसह रावेर शहरातील(Raver City) मालमत्ता कराच्या आकारणीबाबत आज दि २२ ऑक्टोबर शनिवार रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार मा. राजुमामा भोळे व भाजपा जिल्हाउपाध्यक्ष तथा रावेरचे माजी नगराध्यक्ष मा. पद्माकर भाऊ महाजन व श्री दिलीप पाटील श्री अरुण भाऊ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली.[ads id="ads1"]
रावेर नगरपालिका प्रशासननाने लाखो रुपये खर्च करून स्थानिक कर्मचारी यांचे कडून सर्वे न करता एका खाजगी कंपनी मार्फत मालमत्ता मालकांना विश्वासात न घेता कायद्याने कर आकारणीच्या निकषाकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने सर्वे करून नुकतेच नागरिकांना कर भरण्यासाठी अव्वाचे सव्वा बिले अदा करण्यात आलेली आहेत. परंतु सदर कर आकारणी अन्यायकारक असून नागरिकांमध्ये नगरपालिके बाबत असंतोष निर्माण झाल्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांनी व नागरिकांनी याबाबत मुख्याधिकारी नगरपालिका रावेर यांचे कडे निवेदन देऊन कर आकारणी रद्द करावी अशी मांगणी केलेली होती.[ads id="ads2"]
परंतु नगरपालिकेकडून योग्य कारवाई होत नसल्याने आजरोजी पद्माकर महाजन यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार मा. राजूमामा भोळे यांचे नेतृत्वात आणि भाजपा रावेर शहराध्यक्ष दिलीप पाटील व माजी नगरसेवक तथा भाजपा शहर उपाध्यक्ष अरुण शिंदे यांचे उपस्थितीत जळगांव जिल्हाधिकारी मा. अमन मित्तल यांची भेट घेऊन रावेर नगरपालिकेने स्थानिक कर्मचारी वगळून लाखो रुपये खाजगी कंपनीला देऊन सर्वे करण्यामागे गौडबंगाल काय? याची चौकशी करून केलेली मालमत्ता कर आकारणी त्वरित रद्द करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
हेही वाचा : विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- SBI Mudra Loan मुद्रा लोन योजनेमार्फत "यांना" मिळणार एक लाख रुपयांपर्यंत कर्ज
तसेच नवीन हद्दवाढ भागात तीन वर्षात एकही विकास काम न करता कर आकारणी करणे नागरिकांच्या हिताचे नाही आधी सुविधा करा आणि मग कराची वसुली करा अशी मांगणी करून लेखी निवेदन दिले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर शहरातील मान्यवरांच्या व नागरिकांच्या सह्या आहेत.