विवाहितेची चिमुकलीसह आत्महत्या ; जळगाव जिल्ह्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील नीम गावातील 30 वर्षीय विवाहितेने आपल्या आठ वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील नीम गावातील 30 वर्षीय विवाहितेने आपल्या आठ वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.[ads id="ads1"] 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

निम, ता. अमळनेर जि.जळगाव  येथील रहिवासी जयश्री समाधान कोळी (वय 30) व त्यांची मुलगी नंदिनी समाधान कोळी (वय 7) अशी मयत माय-लेकींची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. दोन्ही मायलेकींनी मंगळवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास कळमसरे शिवारातील सबस्टेशन जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.[ads id="ads2"] 

मारवड पोलिसात  गुन्ह्याची नोंद

मारवड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश खलाने करीत आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!