रावेर येथील आगारात एस.टी. कष्टकरी जनसंघ या संघटनेची रावेर आगार कार्यकारिणी गठीत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


https://www.suvarndip.com/2022/10/sd-news_77.html

रावेर येथील आगारात एस.टी. कष्टकरी जनसंघ (सन 2022) या संघटनेची रावेर आगार कार्यकारिणी गठीत करुन मा. आगार व्यवस्थापक श्री. निलेश बेंडकुळे यांना देण्यात आली.[ads id="ads1"] 

      सदर प्रसंगी रावेर आगारातील एस. टी. जनसंघ चे अध्यक्ष श्री. शंकर शालिग्राम पवार, उपाध्यक्ष श्री. दत्तू शंकर कांडेले, खजिनदार श्री. मधुकर पी. कोळी,सचिव श्री. अमीन इतबार तडवी,सहसचिव श्री. विनोद एस.नमायते,कार्याध्यक्ष श्री. संतोष महाजन, प्रसिद्धीप्रमुख श्री. कबीर तडवी, विभागीय सदस्य श्री. खलील खान,महिला प्रतिनिधी सौ. प्रतिभा कोळी,सहसचिव श्री. आसिफ तडवी,सदस्य सल्लागार श्री. किशोर सोनवणे,श्री.पी. जे. सोनवणे, उपाध्यक्ष श्री. विशाल उबाळे, सदस्य श्री. बी. एस. सोनवणे, श्री. के. यू. गोसावी,श्री. पी. व्ही पाटील, श्री. जयसिंग पाटील, ई. सदस्य मोठया संख्येने हजर होते.[ads id="ads2"] 

  सदर कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना डेपो सचिव श्री. अमीन तडवी यांनी सांगितले की, प्रशासनास आमचे नेहमी सहकार्य राहील परंतु हेतूपूरस्कर जर कर्मचारी यांचेवर अन्याय झाल्यास जनसंघ पूर्वी च्या संघटना सारखे न करता सदर अन्यायास वाचा फोडेल तसेच केवळ विरोधाला विरोध म्हणून वाद न घालता नाण्याच्या दोन्ही बाजू पाहून पुढचं पाऊल उचलण्यात येईल.

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

जनसंघ ची कार्यकारिणी स्वीकारतांना आगार व्यवस्थापक श्री.निलेश बेंडकुळे यांनी सकरात्मकता दाखवत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महामंडळ ची सदध्यस्थिती बाबत मार्गदर्शन करून कर्मचारी यांनीही महामंडळास सहकार्य करण्याची विनंती केली.कार्यक्रम समारोप प्रसंगी उपाध्यक्ष श्री. दत्तू कांडेले यांनी आभार व्यक्त केले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!