रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आला 'स्वच्छता ही सेवा' मोहिमे अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसर, आठवडे बाजार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपूर येथे स्वच्छता करण्यात आली. [ads id="ads2"]
स्वयंसेवकांनी कचरा स्रोतांच्या ठिकाणी ओला व सुका कचरा वेगवेगळे करण्यासाठी व एकल प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती केली. तसेच सरपंच, ग्रामपंचायत ऐनपूर कार्यालयात कचरा वहनाकरीता वाहनांची खरेदी करणेबाबत विनंतीपूर्वक निवेदन रा. से. यो. स्वयंसेवकांनी दिले.
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
हे स्वच्छता अभियान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. या अभियानात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाटील यांचे
मार्गदर्शन स्वयंसेवकांना लाभले.