अनेक दिवसापासून वाळू माफियांमुळे भोकर नदी ओरबाडून काढली जात असल्याने गावकरी त्रस्त होते. काल रात्री मात्र उद्रेक झाला. आजूबाजूच्या सहा गावांमधील ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत कोणतेही गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालू देणार नसल्याचे आणि जर गौण खनिज वाहतूक होत असेल तर त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे ठरले.[ads id="ads2"]
रावेर तालुक्यातील के-हाळा येथील भोकर नदीमध्ये वाळू माफी यांनी हैदोस घातल्याने गावकरी त्रस्त होते भोकर नदीमधील गौण खनिज मोठ्या प्रमाणावर वाहतूक झाल्याने पाण्याचा निचरा होणार नाहीत. पर्यायाने पाणी पातळी खालावेल आणि याचे परिणाम भविष्यात शेतीसाठी वाईट होतील. यासाठी गावकरी एकत्र येऊन त्यांनी दि १ ऑक्टोबर रोजी रात्री वाळू व गौण खनिज वाहणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात गावकऱ्यांना यश आले. त्या ट्रॅक्टरांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात देऊन पोलिसांनी दोघेही ट्रॅक्टर गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक शितल कुमार नाईक यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांना देणार निवेदन
या सर्व विषयासंदर्भात पालकमंत्री यांचेकडे गावकऱ्यांच्या सहयाचे निवेदन देण्याचे सुद्धा ठरले. बैठकीला उपसरपंच विनोद पाटील, सदस्य दिपक पाटील चंद्रकांत पाटील, माजी सरपंच राहूल पाटील, अमोल गणेश पाटील शशिकांत पाटील, संतोष महाजन, शशिकांत बेडू पाटील, नितिन लहासे, संजय पाटील, विनोद महाजन, प्रकाश पाटील, कैलास महाजन राजेंद्र इंगळे, चेतन पाटील, सुधाकर पाटील, सुरेश पाटील, भास्कर महाजन, सुधाकर महाजन, प्रकाश पाटील, मधुकर महाजन, कैलास पाटील यांचे सह नागरीक उपस्थित होते.
के-हाळा येथील गावकऱ्यांनी शनिवार च्या रात्री दोन ट्रॅक्टर पकडले होते. रावेर पो. स्टेशनला फोन आल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधिकारी कर्मचार्यांना घेवून तात्काळ पोचले. दोघेही ट्रॅक्टर पो. स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच केबल चोरी संदर्भात सुद्धा या पूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक वाळू, गौणखनीज हा विषय महसूलचा आहे. तरी सुद्धा गावकऱ्यांनी याही पुढे वाळू चोरावर गावातच बंदोबस्तासाठी पाऊल उचलत असेल तर त्यासाठी के-हाळा गावकऱ्यांना पोलीसांचे सहकार्य नेहमी राहील.
-कैलास नागरे, पोलिस निरीक्षक, रावेर पोलीस स्टेशन