धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगाव तालुक्यातील पिंपळे बु !! ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया आज सोमवार रोजी पार पडली. आज झालेल्या निवडणुकीत ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा भगवा फडकला आहे. धरणगाव तालुक्यात शिंदे गटाने दुसऱ्यांदा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली आहे.[ads id="ads1"]
पिंपळे बु !! ग्रुप ग्रामपंचायत पदी आज झालेल्या निवडणुकीत सौ.कविता विनोद पाटील यांची सरपंच पदी तर किरण मनोहर पाटील यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे.
त्यांना ग्रामपंचायत सदस्य जगदीश युवराज पाटील, सूनंदाबाई कैलास पाटील, दिपाली समाधान पाटील, मानसी विनायक पाटील, सूनंदाबाई पांडुरंग पाटील, राजू धुडकू श्रिवंत, यशवंत नामदेव मालचे या सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले. त्यांना प्रमोद दयाराम पाटील व गोपीचंद शेणपडू पाटील यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बेंडाळे साहेब यांनी काम पाहिले.[ads id="ads2"]
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
नवनियुक्त सरपंच यांनी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या आशीर्वादाने व माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वा चा हा विजय असून गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी प्रमोद पाटील यांनी धरणगाव तालुक्यात दुसर्यांदा ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आला असल्याचे म्हटले आहे.