खिर्डीत फटाक्यांची दुकानाची लगबग सुरु : खिर्डीत फटाक्याच्या दुकानाचे एकूण 9 परवाने

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

धनत्रयोदशि अर्थात दिवाळी 24 आक्टोबर पासून सुरु होणार असून खिर्डी बाजारपेठेत गर्दी होत असतांना दिसत आहे ,जवळच येत असलेला दीपोत्सव यंदा मोठ्या प्रमाणात साजरा होणार असल्याचे चिन्ह दिसून येतआहे, दिवाळीची चाहुल सुरु झाली आहे असे पाहाव्यास मिळत आहे. खिर्डी बस स्टॅण्ड परिसरात आता पासूनच फटाक्याची दुकाने थाटलेली दिसून आलेले आहे.[ads id="ads1"] 

  काही जन मोठ्या बजारपेठेकडे सुध्या खरेदि विक्री करण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.दीपावलीच्या पाश्वभुमिवर खिर्डी येथील बाजारपेठ हळूहळू सजत आहे.चार दिवसावर दीपावली सन आहे.खिर्डी बस स्टॅण्ड परिसरात दुकानच दुकाने सजले आहे.[ads id="ads2"] 

      करोना नन्तर यंदा प्रथमच धुम-धडाक्यात साजरी होणार आहे यात शंका नाही,खिर्डी हे 8 खेड्याचे बाजारपेठ आहे, फटाक्याच्या दुकानांचे अर्ज खिर्डी ग्रामपंचायतकडे सादर केले गेले असून सर्व दुकानदारांना दि.20 पासून परवानगी दिली जाणार होती.खिर्डी बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायत ने 9 दुकानाला तात्पूर्ती एन ओसी दिली आहे.निंभोरा पोलीस स्टेशन मधून सुद्धा एनओसी घेतल्याचे समजते. 

फटाक्याच्या दरात 30 ते 35 टक्यांनी वाढ

यंदा फटाक्यांना मागणी जास्त असल्याकारणाने व शिवकाशी येथे फटाक्याच्या उत्पादनात घट झाल्याने परिणामी 30ते 35 टक्के फटाक्याचे दर वाढल्याचे दुकानदाराने सांगितले आहे.

दुकानात विविध प्रकारचे फटाके

भुईचकर,अणार,तडतडी फटाके, फुलझाडी,सुतली बाम्ब,रॅकेटसह प्रदूषणमुक्त फटाके विक्रीस आलेचे दुकानदार रमेश बोरनारे यांनी सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!