शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे/नियोजनाअभावी गोरगरिबांची दिवाळी अंधारातच....? काही खेड्या- पाड्यात आनंदाचा शिधा किट पोचलेच नाही

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे/नियोजनाअभावी गोरगरिबांची दिवाळी अंधारातच....? काही खेड्या- पाड्यात आनंदाचा शिधा किट पोचलेच नाही

 रावेर तालुका प्रतिनिधी(विनोद कोळी)

     फडणवीस-शिंदे सरकारने दिवाळीनिमित्त जाहीर केलेले शिधा आनंदाचे किराणा किट जिल्हा आणि तालुक्या स्तरावर उशिरा आले.त्यामुळे रावेर तालुक्यातील ,काही धान्य  दुकानामध्ये शिधा किट पोहोचले आहेत. तसे शासनाचे आदेश आज दिनांक 23 रोजी रावेर तालुक्यातील सर्व राशन धान्य दुकानदारांना किराणा किट वाटपाबाबत तसे आदेश देण्यात आले होते.[ads id="ads1"] 

  तरी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे स्वस्त धान्य राशन दुकानांमध्ये आनंदा शिधा किट उशिरा पोहोचले गेले. त्यामुळे गोरगरीब लोकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. आनंदा शिधा किट मध्ये चार वस्तू समाविष्ट केलेले आहेत त्या पुढील प्रमाणे (साखर ,रवा, चनाडाळ ,आणि पामतेल .अशा चार प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत. या या चार गोष्टी आहेत. दिवाळीच्या तोंडावर गोरगरिबांना मिळू शकले नाहीत.[ads id="ads2"] 

  त्यामुळे याला जबाबदार शासन की स्वस्त राशन धान्य दुकानदार? असा सवाल लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

शिंदे सरकारने किराणा किट वेळेवर वाटण्याचे सक्त आदेश शासनाला दिले होते .तरी देखील शासनाने हलगर्जीपणा केली. आणि ऐन दिवाळीच्या तोंडावरच गोरगरिबांची दिवाळी अंधारात राहिल्याचे चित्र आहे.


👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील मंगरूळ शिवारातून 11 हजारांची कॉपर वायर लांबवली : रावेर पोलिसांनी केली आरोपीस अटक 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!