ऐनपूर (विनोद कोळी) : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील प्लास्टक संकलन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी रा. से. यो. स्वयंसेवकांना प्लास्टिकमुक्त भारत याबद्दल मार्गदर्शन केले. [ads id="ads2"]
या कार्यक्रमाकरिता राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. बी. पाटील व डॉ. एस. बी. पाटील तसेच महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाटील, शिक्षकेतर कर्मचारी व रा. से. यो. स्वयंसेवक उपस्थित होते.