दिवाळी दरवर्षी येत असते. याही वर्षी आली. मोठ्या थाटामाटात आली. परंतू यावर्षषीची दिवाळी ग्रहण घेवूून आली. यावर्षी सुर्याला ग्रहण आहे. काही लोकांना सुतकही आहे.
ग्रहण.........ग्रहण जसं आयुष्याला लागतं. एखादं संकट येतं. तसंच ग्रहण चंद्र सुर्यालाही लागतं. तेच ग्रहण यावर्षी ऐन दिवाळीत सुर्याला आहे आणि नेहमीच्या अंधश्रद्धेनुसार हे खावू नये, ते खावू नये. म्हणणारे व हे दान करा, म्हणत आपलीच पोळी भाजणारे महाभागही या काळात भरपूर आहेत. ते या ग्रहणाचा फायदा घेवून भोळ्याभाबड्या जनतेकडून जबरदस्तीनं दान मागून घेतात. ग्रहणाचा त्या वस्तूंवर विपरीत परिणाम होतो असं सांगून. परंतू आपण विचार करायला हवा की जी माणसं दानन मागतात. त्या माणसांवर दान घेतलेल्या वस्तूंचा काहीही परिणाम होत नसेल काय? परंतू दसा विचार करण्याची क्षमता आपली नाही. त्यासाठी आपल्याजवळ वेळंही नाही.[ads id="ads1"]
ग्रहणाचा कोणता परिणाम होतो आपल्या जीवनावर? खरंच परिणाम होतो का याचा? की निव्वळ या गोष्टी थोतांड आहेत? याबाबत शास्रज्ञही सांगतात की परिणाम होतो. परंतू थोडासा होतो. ज्याला आमच्या देशातील काही महाभाग त्याला अंधश्रद्धेची जोड देवून त्या गोष्टीचा एवढा बाऊ करतात की पुढील व्यक्ती इतका घाबरतो की त्याचं अवसानच गळतं. आता ग्रहणाचाा कोणता परिणाम होतो ते सांगतो.[ads id="ads2"]
आपल्याला माहित आहे की दर महिण्यात चंद्र आणि सुर्य आकाशात उगवत असलेले दिसतात. त्यांची ही उगवण्याची सेवा अविरत चाललेली असते. तसेच दर महिण्यात अमावश्या व पौर्णीमाही उजळत असते. हे आपल्याला माहित आहे. त्यातच आपल्याला हेही माहित आहे की आपली पृथ्वी सुर्याभोवती फिरते आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. का फिरतो? कारण तो आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे. पृथ्वी सुर्याभोवती का फिरते. कारण ती त्याची ग्रह आहे. हे या दोघांंचेही फिरणे सुरु असतांना त्यांच्या फिरण्यातून ऊष्णता निर्माण होते. कारण हे दोघंही अतिप्रचंड वेगाने फिरत असतात. ही निर्माण झालेली उष्णता. त्या उष्णतेचं रुपांतर चुंबक उर्जेत निर्माण होतं. मग याच चुंबकीय उर्जेनं समुद्रात भरती ओहोटी निर्माण होते. हे सर्वांना माहित आहे. तसेच ही भरती ओहोटीची प्रक्रियाही सर्वांना माहितच आहे. ही भरती ओहोटी का येते? कारण चंद्र पृथ्वीभोवती फिरतांना तो अमावस्येला पृथ्वीपासून थोडा दूर असतो. तर पौर्णीमेला अगदी जवळ. त्यामुळं तो पृथ्वीच्या जेव्हा जवळ असतो. तेव्हा समुद्राचं पाणी ही वर खिचल्या जातं. याला भरती म्हणतात. यावेळी समुद्र खवळलेला असतो व समुद्रात प्रचंड प्रमाणात लाटा निर्माण होतात. दो दूर जाताच त्या लाटा निवळतात व समुद्र शांतही होतो. आता महत्वपुर्ण मुद्दा हा की जेव्हा ग्रहण लागतं. तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीवर कसा होतो?
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- SBI Mudra Loan मुद्रा लोन योजनेमार्फत "यांना" मिळणार एक लाख रुपयांपर्यंत कर्ज
यात सर्वप्रथम ग्रहण म्हणजे काय? ते समजून घेवू. ग्रहण म्हणजे संकट येणे. अचानक आपण आनंदानं जगत असतांना आपल्या जीवनात अचानक एखादी वाईट गोष्ट घडते. याला ग्रहण असं म्हणता येईल. तीच गोष्ट पृथ्वी, सुर्य आणि चंद्रालाही लागू आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास दोन वस्तूच्या मध्ये तिसरी वस्तू येणे, त्याला ग्रहण म्हणता येईल. मग कोणती वस्तू येते, त्यांच्या मधात, ज्याला आपण ग्रहण म्हणतो. ज्यावेळी चंद्रग्रहण असतं. त्यावेळी चंद्र आणि पृथ्वीच्या मधात सुर्य येतो. चंद्र पृथ्वीवरील लोकांना दिसत नाही आणि ज्यावेळी सुर्यग्रहण असतं. त्यावेळी चंद्र हा सुर्य आणि पृध्वीच्या मधात येतो. अशावेळी सुर्य पृथ्वीलार दिसत नाही. मग काय, ज्यावेळी सुर्याचा पृथ्वीला काही काळ संपर्क नसल्यानं येथील जीवजंतू सक्रीय होतात. ते जीवजंतू अन्न, पाणी आणि घरातील सर्वच वस्तूंना बधा पोहोचवतात. कारण त्यांच्या मध्ये असलेली चंबकीय शक्ती अर्थात निर्माण होणारी उष्णता काही काळ थांबते. ती त्यांची हालचाल अगदी मायक्रो स्वरुपाची असते. हाच पृथ्वीवरील लोकांवर होणारा गंभीर परिणाम होय. तो परिणाम एवढा मायक्रो स्वरुपाचा असतो की तो ताबडतोब जाणवत नाही. तो कालांतरानं जाणवतो. हा होणारा परिणाम टाळता येत नाही. तो कुणाला दान दिल्यानंही टाळता येत नाही वा कोणती कथा केल्यानंही टाळता येत नाही. ना हा परिणाम मंदीर बंद ठेवल्यानं टाळता येत नाही वा मुर्त्या झाकून ठेवल्यानं. कारण जिथे हवा आहे, पाणी आहे वा जीवसृष्टी आहे, तिथे तो परिणाम होणारच. कारण समजा एखादा कमरा जरी पुर्णतः सहा महिने बंद करुन जरी ठेवला तरी सहा महिण्यानं तो कमरा उघडल्यावर तिथे धुळ दिसतेच. ही धूळ कुठून येते? याचा विचारच आपण करीत नाहीत आणि चंद्र सुर्याच्या या ग्रहणाला अंधश्रद्धेचे रुप देतो.
ग्रहणात बाहेर पडू नये असे म्हटले जाते व अंधश्रद्धा पसरवली जाते. बाहेर न पडणे बरोबर आहे. कारण ग्रहण सुरु असतांना पृथ्वीच्या सुर्या भोवती फिरण्याने नििर्माण होणारी उष्णता, ज्याला आपण चुंबकीय उर्जा म्हणतो. ती काही काळ पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही व शरीरावर असलेले जीवजंतू शरीराला अपाय करतात. म्हणूनच तेे जीवजंतू निघून जावे वा शरीराला त्यांनी अपाय करु नये म्हणून ग्रहणानंतर आंघोळ करण्याची प्रथा आहे. परंतू अंधश्र्द्धा बाळगून कुणाच्याही सांगण्यानं त्याच ग्रहणाचा परिणाम झालेल्या वस्तू कुणालाही देवून त्यांच्याक आयुष्याचा उध्वस्थपणा कोणीही करु नये. त्या वस्तू हव्या तर फेकून द्याव्यात किंवा काही काळ त्याचा वापर करु नये. ग्रहणाची स्थिती पुर्ववत होईपर्यंत.
महत्वाचं म्हणजे काही लोकं तर ग्रहण झाल्यावर ब्राम्हण वा शुद्रांना काही वस्तू दान देतात. म्हणतात की आपल्यावरील अलाबला जावो. ही अला बला दान दिल्यानं जात नाही. ती जोते पुन्हा चंद्र सुर्याच्या पुर्ववत स्थितीत आल्यावर. जेव्हा ग्रहण सुटतं. त्यानंतर पुन्हा ती चुंबकीय शक्ती सक्रीय होते व त्यानंतर पुन्हा जनजीवन सुरळीत पुर्ववत स्थितीत येतं. परंतू त्याला वेळ लागतं. कारण कोणतीही तूट ही भरून निघत नाही. जसे. दोन तुटलेले दगड पुर्ववत स्थितीसारखे जोडता येत नाही तसे.
दान देणे वा मंदिर बंद ठेवणे वा हे खावू नये, ते खावू नये असे म्हणणे या भ्रामक कल्पना आहेत. त्या अंधश्रद्धा पसरविणा-या गोष्टी आहेत. त्यांचा बाऊ करु नये. त्या गोष्टीचा आपल्या जीवनावर पाहिजे त्या प्रमाणात काहीच वाईट परिणाम होत नाही. होतो तो प्रदुषणाचा. दिवाळी आपण साजरी करीत असतांना जे फटाके फोडतो. त्यातून निघणारी स्फोटके व वायू हे आपल्या श्वसनाच्या मार्गानं आपल्या शरीरात जातात. ते वायू आपल्या शरीरावर अतिशय घातक परिणाम करतात. ती स्फोटके असाही परिणाम करतात की ज्या परिणामातून आपलं एखादं अंग प्रभावीत होतं. ज्यातून कँन्सरसारखे महाभयंकर आजार होवू शकतात. कोणाला पक्षाघात होवू शकतो तर कोणी वेगवेगळ्या आजारानं ग्रासीत होवू शकतो. तसेच या फटाके फोडण्यातून फटाक्याचा जो कचरा गोळा होतो, तो कचराही अनेक दिवसपर्यंत जमीनीवर पडून राहतो. त्या फटाक्यातून जी बारुद जमीनीवर पडते. तिला पाण्याचा स्पर्श जेव्हापर्यंत होत नाही. तेव्हापर्यंत ती तशीच राहते. परंतू त्या बारुदला पाण्याचा स्पर्श झाला तर त्या बारुदमधून किरणोत्सर निरोधक वायू तयार होतात. जे वायू वातावरणात मिसळून वातावरणात असलेल्या ओझोनशी संयोग पावतात. त्यातच वातावरणातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते. हे पावसाळ्यात उत्पन्न होणारे वायू आपल्या डोळ्यानं दिसत नाहीत. परंतू आपल्याला हे माहित आहे की पावसाळ्यात वातावरण कुंद असतं. गुदमरल्यासारखं वाटतं.. असं का होतं? याचा विचार आपण कधीच करीत नाहीत. पावसाळ्यात हवेत ऑक्सीजनची मात्रा कमी होत असल्यानं असं गुदमरल्यासारखं वाटतं. असं होवू नये म्हणून दिवाळी प्रदुषणमुक्त करण्याची गरज आहे. कचरामुक्त करण्याची गरज आहे. तसेच दिवाळी फटाकेेमुक्त करण्याची गरज आहे. ग्रहणात घरात लपून वा स्वतःला कोंडून ठेवण्याची गरज नाही.
✍️अंकुश शिंगाडे, नागपूर ९३७३३५९४५०