आज दिनांक 14 ऑक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच 'युवा क्रांती फाऊंडेशन' स्थापना दिवस त्यानिमित्ताने चिनावल येथे फाऊंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप असा उपक्रम राबविण्यात आला. [ads id="ads1"]
जि. प.शाळा( मुले व मुली) चिनावल दोन्ही शाळेत विद्यार्थ्यांना, एक वही एक पेन वाटप करण्यात आले. आज जि. प शाळांची अवस्था अतिशय दयनीय आहे.जि. प शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या वाढली पाहिजे, ह्या शाळा टिकल्या पाहिजे, शेतकरी,शेतमजूर, आदिवासी,या मुलांना घटनेत दिलेल्या तरतुदी नुसार प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत मिळालेच पाहिजे. [ads id="ads2"]
या एकमेव उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला. भविष्यात देखील फाउंडेशन अशाच पद्धतीने महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून, त्यांच्या संकल्पनेतील समाज घडण्यासाठी प्रबोधनात्मक काम करेल असा सर्व सदस्यांच्या वतीने संकल्प करण्यात आला.


