नाशिक जिल्हा प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नांदगाव शहरांमधील असलेल्या वैजीनाथ जिजाऊ हायस्कूल शाळे वरील पोषण आहारात घोटाळा झाला असून निकृष्ट पोषण आहार पुरवला जात असल्याचं सुनील सोनवणे यांनी नांदगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.[ads id="ads1"]
कोरोना काळातील पोषण आहार विजय हायस्कूल ने कुठे गायब केला याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. शिक्षण हक्क कायद्याने फिक्स माप असताना या शाळेने विद्यार्थ्याकडून घेतलेली फी परत करावी, शिक्षक शाळेत न राहता घर भाडे भत्ता घेत असल्याने घर भाडे भत्ता बंद करून कायदेशीर कारवाई करावी.[ads id="ads2"]
तसेच जातेगाव येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे भ्रष्टाचारी शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी फसवणूक करून पिनाकेश्वर जातेगाव येथे विश्वस्त झाल्याने कायदेशीर कारवाई करून शिक्षक पदावरून करावे, जिल्हा परिषद शिक्षक एस पवार यांनी शिक्षण विभागाची फसवणूक करून पिनाकेश्वर ट्रस्ट जातेगाव येथे विश्वस्त झाल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व शिक्षक पदावरून बडतर्फ करावे. शिक्षक नेते स्वर्गीय अण्णासाहेब गंगाधर शिवराम आहेर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था संस्थेत निवडणूकीत फसवणूक करून निवडून आलेले चेअरमन मवाळ यांना पत्र करून कायदेशीर कारवाई करावी. पतसंस्थेमध्ये चार शिक्षक यांच्याकडे थकबाकी असतानाही फसवणूक करून निवडून आल्याने त्यांना पत्र करावे. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी नांदगाव पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रमुख चिंचोली विस्ताराधिकारी यांनी भेट दिली. चौकशी करून कारवाई करण्याची आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन हे उपोषण सोडण्यात आले. नागपूर टेशन सामाजिक कार्यकर्ते सुनील सोनवणे यांनी सत्याग्रह आंदोलन केल्यानंतर या आंदोलनामध्ये आश्वासन दिल्यानंतर तसेच मध्ये केल्यानंतर त्यांनी नारळ पाणी पिऊन हे उपोषण सोडले .


