रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी)
फडणवीस शिंदे सरकारने घोषित केलेल्या दिवाळी सणानिमित्त आनंद शिधा किट वाटपाबाबत सक्त आदेश दिलेले होते.पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे/निष्काळजीपणा मुळे,काही गरज असलेल्या आदिवासी भागात आनंद शिधाकीट पोहोचले गेले. तर काही भागात आनंद शिधा किट ऐन दिवाळीच्या आदल्या दिवशी पोहोचले गेले.[ads id="ads1"]
आनंद शिधा किट मध्ये शासनाने चार खाद्यपदार्थ पारित केलेले आहेत, त्यामध्ये (रवा ,पामतेल, चणाडाळ, आणि साखर .)हे चार खाद्यपदार्थ आहेत .पण साखर न देता ,वरील तीन खाद्यपदार्थाची वाटप राशन धान्य दुकानात करण्यात आली .त्यामध्ये साखरेचा समावेश नसल्यामुळे साखरे विना शिरा फिकाच? राहिला म्हणून नागरिकांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत. [ads id="ads2"]
शासनाकडून साखरेचा कीट येईल तेव्हा वाटप होईल, असं स्वस्त राशन धान्य दुकानदाराकडून सांगितले जात आहेत. शासनाच्या सक्त आदेशामुळे आज ऐन दिवाळीच्या दिवशी इतर खेड्यांमध्ये ,आणि आज निंबोल (Nimbol Taluka Raver Dist Jalgaon) गावांमध्ये शिधा आनंद किटचे वाटप करण्यात आले.
👉 हेही वाचा :- Jalgaon : मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
आणि गोरगरिबांच्या दिवाळीला हातभार मिळाला .तसेच वेळेवर आनंद शिधा किटचे वाटप राशन धान्य दुकानदार पुंडलिक महाजन यांनी निंबोल गावामध्ये केल्याबद्दल, त्यांचे स्वागतही करण्यात आले स्वागतप्रसंगी प्रहार दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष -विनोद कोळी .निळे निशाण तालुका अध्यक्ष- विजय धनगर .आकाश ठाकरे .मोहन धनगर .तसेच गावातील इतर लोकांची उपस्थिती होती.