जळगाव शहरात पुन्हा एकदा खून झाला असून पतीने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जळगाव शहरातील आहुजा नगर (Ahuja Nagar, Jalgaon) परिसरातील शिवधाम मंदिरासमोरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये पतीने पत्नीचा मोबाईल चॉर्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. [ads id="ads1"]
कविता जितेंद्र पाटील (वय २०) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर जितेंद्र संजय पाटील (वय २५) असे संशयित पतीचे नाव आहे. जितेंद्र हा पत्नीला गळफास दिल्यानंतर स्वतःच जळगाव तालुका पोलीस ठाण्यात (जळगाव Taluka Police Station) हजर झाल्याची ही माहिती मिळाली आहे. पत्नीचे तरुणासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून पतीने हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.[ads id="ads2"]
या संदर्भात मयत महिलेच्या नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की, आहुजा नगर परिसरात ब्रह्मांडनायक अपार्टमेंट असून अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र संजय पाटील हा पत्नी कविता व दीड वर्षाची मुलगी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. जितेंद्र हा मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह भागवितो. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पती जितेंद्र याचा पत्नीसोबत वाद झाला.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
या वादातून जितेंद्र याने मोबाईलच्या चार्जरच्या (Mobile Charger Wire) वायरने पत्नी कविता हिचा गळा आवळून खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती जितेंद्र हा स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. व त्यानेच पोलिसांना मी पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. तातडीने कविता हिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात(Civil Hispital Jalgaon) हलवला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची पुढील कारवाई सुरू होती.