दीपनगर ता.भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी समस्त मानवास केवळ धर्मग्रंथात लिहिले आहे वा हजारो लाखो लोक सांगत आहेत वा हजारो वर्षापासून चालत आली आहे म्हणून एखादी गोष्ट सत्य आहे असे न मानता ति गोष्ट तुमच्या सदसदविवेक बुद्धीस सत्य आहे असे वाटत असेल तरच तिचा स्वीकार करा वा सत्य आहे असे माना असा संदेश दिला आणि जगात बुद्धीप्रामाण्यवादाची निर्मिति झाली असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.[ads id="ads1"]
प्रगतिक विचारमंच भुसावल तर्फे दीपनगर येथील बुद्ध विहारात 30 ऑक्टोबर रोजी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन मैत्री सोहळा या कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.[ads id="ads2"]
जयसिंग वाघ यांनी पुढ आपल्या भाषणात सांगितले की गौतम बुद्ध यांनी जगात सर्वप्रथम मानवतावाद मांडला , स्त्री - पुरूष समानता प्रस्थापित केली , शांतता , अहिंसा ही तत्वे सांगितली , मानवाचे आदि कल्याण , मध्य कल्याण , अंतिम कल्याण यास आपल्या विचारांचा केंद्रबिंदु ठरविले , गौतम बुद्ध यांचा कार्यकारणभाव हा सिद्धांत वैज्ञानिक कसोटिवर खरा उतरला म्हणून आइंस्टाइन यांनी बुद्धास जगातील पहिला वैज्ञानिक म्हणून संबोधले , गौतम बुद्ध यांनी आपल्या जीवनातील तब्बल पंचेचाळीस वर्षे मानवी कल्याणा करिता खर्ची घातली व समतामूलक समाज व्यवस्था निर्माण केली , त्यांच्या समता , स्वतंत्र्याच्या तत्वानची आज सर्व जगाने दखल घेतली आहे असेही वाघ यांनी स्पष्ट केले
मंचावर सुनील रामटेके , डॉ वंदना वाघचौरे ,मुकुंदा बारे , अलका सपकाळे , रामकृष्ण सुरवाड़े , प्रा दिलीप तायड़े , महेंद्रकुमार तायड़े मुख्य अतिथि म्हणून हजर होते. अध्यक्षस्थानी जे पी सपकाळे होते