Raver : निंबोल-ऐनपूर परिसरात वृक्ष तोडणाऱ्या दलालांचा हैदोस रावेर येथील वनपाल अधिकारी यांचे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) झाडे लावा झाडे जगवा ही महाराष्ट्र शासनाची संकल्पना जोपासण्याचे आदेश, सर्व महाराष्ट्र शासनाने ,सर्वांना दिलेली आहेत. एक झाड म्हणजे एक कोटी ऑक्सिजन असे मानले जाते. म्हणून झाडे ही निसर्गाची देण आहे. ती काळजीपूर्वक जोपासली पाहिजे. एक घर एक झाड ,अशी संकल्पना घरोघरी जोपासली  जाते. [ads id="ads1"] 

  तसेच वृक्ष हे निसर्गाचे आधारस्तंभ आहेत. वृक्ष आहे तर ,निसर्ग आहे नाहीतर सर्व व्यर्थ आहे, असे मानले जाते. पण या उलट परिस्थिती खूप बिकट झालेली दिसून येत आहेत. रावेर तालुक्यातील निंबोल, ऐनपूर परिसरात वृक्ष तोडणाऱ्या दलालांचे प्रमाण खूप वाढलेले आहेत .त्यामुळे वृक्ष खूप कमी झालेले दिसून येत आहेत. [ads id="ads2"] 

  यामध्ये निसर्गाची खूप हानी होत आहे. वेळोवेळी रावेर येथील वनपाल अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील वनपाल अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असे दिसून येत आहेत, याला जबाबदार  वनपाल अधिकारी की प्रशासन?असा प्रश्न लोकांना पडला आहे.

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- सावद्यात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ; जमावाने दुचाकीसह चारचाकींची केली तोडफोड ; सावदा पोलिसात संशयितांवर गुन्हा दाखल

हेही वाचा:- प्रहार दिव्यांग संघटना तर्फे रावेर पोलीस स्टेशन मध्ये रवी राणा विरोधात गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे मागणी 

 कारण वृक्षतोडीचे प्रमाण निंबोल, ऐमपूर ,परिसरात खूप वाढले आहेत. म्हणून वृक्ष तोडणाऱ्या दलालांना आळा घालणार का? असा सवाल संतप्त  नागरिकांकडून होत आहेत. निंबोल ऐनपुर परिसरातील वृक्ष तोडणे जर का थांबले नाही तर, योग्य तो निर्णय घेऊ, असे मत निंबोल ,ऐनपूर  परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!