विवरे बु ता.रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे)
रावेर तालुक्यातील विवरे बु येथे ग्रामपंचायतीच्या लिपीक , शिपाई , पाणी पुरवठा कर्मचारी , सफाई कर्मचारी तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी करता यावी. यासाठी १६ कर्मचाऱ्यांना आक्टोंबर महिन्याचे अगाऊ वेतन ( पगार ) देण्यात आल्याची माहिती सरपंच ईनुस तडवी , ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी दिली.[ads id="ads2"]
आक्टोंबर महिना संपण्याचे आधीच आगाऊ पगार दिल्याने कर्मचाऱ्यांची परिवारासोबत उत्साहात दिवाळी साजरी होणार असल्याचे समाधान आहे. असेही सरपंच इनुस तडवी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. ग्रामविकास अधिकारी यांनी सक्तीची करवसुली करुन व कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.