नाशिक (मुक्ताराम बागुल) जिल्ह्यातील नांदगाव शहराच्या मध्यवर्ती या भागात असलेल्या रेल्वेच्या सबवे नांदगावकर साठी मोठे डोकेदुखी ठरली असून नांदगाव शहराच्या दोन भागांना जोडणारा हा सर्वे अतिशय चुकीचा बांधला गेल्याने या ठिकाणी नित्यनेमाने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. [ads id="ads2"]
त्यातच या भागात सरकारी रुग्णालय असून त्या भागामधून मनमाड, मालेगाव, नाशिक किंवा नांदगाव शहरातील खाजगी रुग्णालयात रुग्णांना न्यावे लागते. मात्र या सबवे मधून जाताना रोज वाहतूक कोंडी होत असल्याने यात रुग्णवाहिका अडकून पडली तर पूर्ण जगण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरच यामुळे रुग्णांना देखील नाग त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व समस्यांकडे लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.