रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर येथे दि. २१ ऑक्टोंबर शुक्रवार रोजी, रावेर नगरपालिका मुख्याधिकारी यांना वाढीव कर आकारणी बाबत शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने प्रणित महाजन यांचे नेतृत्वात कार्यालय अधिक्षक सर्फराज तडवी यांना सन २०२२-२३ ते २०२५-२६ या चतुर्थ कर आकरणीत नगरपालिका हद्दीत व हद्दी बाहेरील मालमत्तेची केलेली अवास्तव कर आकारणी बाबत विषय निहाय सविस्तर माहिती मिळावी यासाठी पत्र देऊन हरकती नोंदविल्या.[ads id="ads1"]
यात प्रामुख्याने ९ विषयांची माहिती पत्रात मागितली आहे. (१)मालमत्तेवरील कर आकारणी करणे आधी संबंधित मालमत्ता धारकांकडून त्यांचे मालमत्तेसहित माहिती नियमानुसार घेतलेली आहे किंवा नाही?, (२)कर आकारणी करिता केलेल्या झोनचा नकाशा व झोन बाबतची माहिती, (३)झोननुसार आकारणीसाठी लागू केलेले दर सुचिची नक्कल, (४)कर बसविण्या संबंधी ज्या दराने हा कर बसविण्यात आलेला असेल त्या संबंधी ठरावाची प्रत, [ads id="ads2"]
(५)सदर ठराव मंजूर केल्यानंतर ज्या दराने कर आकारणी करावयाची आहे आणि ज्या तारखेपासून करावयाची आहे. त्याबाबतची प्रसिद्ध केलेल्या नोटीसीची व वृत्तपत्राची प्रत, (६)डाटा रजिस्टर ची नक्कल, (७)नविन कर वाढी बाबत शासनाचे मार्गदर्शक सूचना,जीआर,नियम, (८)हद्दवाढ कधी झाली आहे? त्याची माहिती व नविन वाढीव हद्दीत कर आकारणी कधी पासून करावी व कशी करावी, (९)कर वाढी बाबतची केलेली कार्यवाही नगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फत न करता ज्या एजंसी मार्फत केलेली आहे. त्याची ठरावासह माहिती तसेच त्यांना किती रक्कम अदा केली आहे व ती कोणत्या निधीतून अदा केली आहे. तसेच कर वाढी बाबत एजंसी नेमणे संबंधी शासनाचे जीआर,नियम या विषयीची माहिती मिळण्यासंबंधीचे पत्र देण्यात आले असून सदरची महिती योग्य त्या प्राधिकरणाकडे व न्यायालयाचे कामासाठी तातडीने मिळावी अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. यावेळी शहरातील असंख्ये नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.