पिक विम्याची प्रलंबित रक्कम मिळून दिल्याबद्दल डॉ विवेक सोनवणे यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)

मुक्ताईनगर तालुक्यातील प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत भारती एक्सा कंपनीकडे शेतकऱ्यांची विम्याची थकित रक्कम मिळून दिल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांचे शेतकऱ्यांकडून शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करण्यात आले.[ads id="ads1"] 

   शेतकऱ्यांनी भारती एक्सा कंपनीद्वारे कॉटन विमा काढलेला होता व नुकसानीच्या अनुषंगाने हेक्टरी १५०००/- रुपये मदतही बहुतांश शेतकऱ्यांना कंपनीद्वारे देण्यात आली परंतु तालुक्यातील बरेच शेतकऱ्यांना नुकसानीचा पहिला हप्ता २८०० रुपये मिळाला व उर्वरित रक्कम १२२०० मागील सहा महिन्यांपासून मिळालेली नव्हती या संदर्भात संबंधित पीडित शेतकरी कृषी अधिकारी ,तालुका प्रशासन, विमा प्रतिनिधी यांच्याकडे वारंवार खेटे घालत होते परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवून उडवा उडवीचे उत्तर देऊन वेळ काढूपणा करण्यात येत होता त्यामुळे सदर पीडित शेतकऱ्यांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांच्याकडे तक्रार केली.[ads id="ads2"] 

   त्यासंदर्भात डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी तात्काळ संपर्क करून सदर प्रकार निदर्शनास आणून देऊन तात्काळ पीडित शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तात्काळ तत्परता दाखवत सदर कंपनीला शेतकऱ्यांना लाभाची रक्कम देण्याचे तात्काळ आदेशित करून पीडित शेतकऱ्यांना रक्कम त्यांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडून तात्काळ जमा करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी

 त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून डॉ विवेक सोनवणे यांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करण्यात आले याप्रसंगी दीपक पटेल, भगवान दुट्टे, पंकज पटेल प्रदीप पटेल योगेश भोपळे ,संतोष शेळके ,निखिल पटेल, सचिन पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!