नाशिक जिल्हा प्रतिनिधी- (मुक्ताराम बागुल)- नांदगाव तालुक्यातील हि उच्चरवळ खुर्द येथील सीआरपीएफ जवान नवनाथ पुंजाराम आहेर वय वर्ष 26 यांचा अपघात होऊन मृत्यू झाला.[ads id="ads1"]
हिरवळ खुर्द येथील भूमिपुत्र नवनाथ पुंजाराम आहेर हा सीआरपीएफ जवान मोटरसायकलने मनमाड येथून ईश्वर कडे येत असताना जोंधळवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाजवळ धडक दिल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे हिसवळ गावासह संपूर्ण नांदगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोककळा पसरली आहे.[ads id="ads2"]
मणिपूर येथे सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेला नवनाथ आहेर वय वर्ष 26 हा पंधरा दिवसाच्या सुट्टीवर आलेला होता. शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास ते मोटरसायकलने मनमाडहुन हिसवळकडे येत असताना गोंधळवाडी फुलाच्या फुलाच्या कठड्यावर जाऊन धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच हिसवळ गावावर शोककळा पसरली.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
गेल्या पाच वर्षांपूर्वी ते सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी आणि पाच महिन्याची चिमुकली मुलगी असा परिवार आहे.
सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेले दिवंगत नवनाथ आहेर यांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात नाशिक येथून आलेल्या रॅपिड ऍक्शन टीमच्या जवानांनी अखेरची सलामी दिली. 143 सीआरपीएफ बटालियनच्या कमांडो अधिकारी यांनी या दुखत प्रसंगी आम्ही परिवारासोबत आहोत असा संदेश दिला. शेवटी राष्ट्रगीत आणि भारत माता की जय, वीर जवान अमर रहे! अशा घोषणा देऊन दुःखद अंतकरणाने नवनाथ आहेर या जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला.
नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, सागर हिरे, तलाठी आठवले, नानासाहेब काकळीज यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते .